रिअॅलिटी शोचे परीक्षक होण्यासाठी इतकी फी घेतात ...

रिअॅलिटी शोचे परीक्षक होण्यासाठी इतकी फी घेतात हे सेलिब्रेटी (These Celebs Charge Hefty Fees to Judge or Host a Reality Show, You Will Be Surprised to Know)

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही पाहायला मिळतात. सलमान खानपासून अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षितपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार रिअॅलिटी शोचे परीक्षक किंवा होस्ट म्हणून छोट्या पडद्यावर दिसतात. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर पाहायला आवडते. हे कलाकार चित्रपटासाठी कित्येक कोटी रुपये घेतात यात शंका नाही, पण छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी किंवा परीक्षण करण्यासाठी हे सेलिब्रिटी किती मानधन घेतात हे तुम्हाला माहीत आहे का?

अमिताभ बच्चन

मेगास्टार अमिताभ बच्चन हे केवळ बॉलिवूड चित्रपटांमध्येच सक्रिय नसून ते छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय आहेत. बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन ‘केबीसी’च्या एका एपिसोडचे सूत्रसंचालन करण्यासाठी 2.5 कोटी रुपये घेतात.

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसचे सूत्रसंचालन करतो. विशेष म्हणजे आपल्या लोकप्रियतेनुसार सलमान खान प्रत्येक एपिसोडचे सूत्रसंचालन करण्यासाठी भरमसाठ फी देखील घेतो.सलमान बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी 11 कोटी रुपये घेतो असे म्हटले जाते.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आता चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही, पण तिला पाहून आजही अनेक प्रेक्षक घायाळ होतात. माधुरी छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शोचे परीक्षण करते आणि परीक्षक म्हणून ती एका एपिसोडसाठी सुमारे 1 कोटी रुपये आकारते.

करण जोहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर सध्या ‘कॉफी विथ करण’ हा शो होस्ट करत आहे, या शोसाठी तो भरघोस फी देखील घेत आहे, त्याआधी ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या प्रत्येक सीझनसाठी करण जोहरने 10 कोटी रुपये शुल्क आकारले होते.

कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. एवढेच नाही तर कपिल शर्मा त्याच्या अनोख्या विनोदी स्टाइलसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा शो’चा एक एपिसोड सूत्रसंचालन करण्यासाठी 50 लाख रुपये घेतो.

रोहित शेट्टी

सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी हा स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ होस्ट करतो आणि त्यासाठी तो भरघोस फी देखील घेतो. रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टी खतरों के खिलाडीच्या एका एपिसोडसाठी 49 लाख रुपये घेतो.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडमधील फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोजचे परीक्षण करते. शिल्पा रिअॅलिटी शोचे परीक्षण करण्यासाठी भरमसाठ फी घेते. असे म्हणतात की शिल्पाला एका एपिसोडसाठी 22 लाख रुपये देण्यात येतात.

नेहा कक्कड

आपल्या जादुई आवाजाने सर्वांची मनं जिंकणारी गायिका नेहा कक्कडची गाणी लोकांना आवडतात. गाण्याव्यतिरिक्त, नेहा गायनाच्या रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील करते आणि त्यासाठी ती खूप मोठी रक्कम घेते. गायनाच्या रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडसाठी नेहा सुमारे ५ लाख रुपये घेते.