सुपरहिट चित्रपट नाकारून या बॉलिवूड सुपरस्टार्सन...

सुपरहिट चित्रपट नाकारून या बॉलिवूड सुपरस्टार्सना नंतर पश्चाताप झाला (These Bollywood Stars Reject Superhit Movies)

सलमान खान, शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले सुपरहिट चित्रपट नाकारले आणि नंतर त्यांना त्याबद्दल पश्चाताप करावा लागला होता.

एकंदरच आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये ज्या कलाकारांचे चित्रपट यशस्वी ठरतात तेच कलाकार  सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात. म्हणजे काय तर काही चित्रपट या स्टार्सना सुपरस्टार बनवतात, तर काही चित्रपट स्टार्सना फ्लॉपही करतात. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स होते ज्यांची एकेकाळी चमक होती, पण आज ते कुठेच नाहीत. तर असेही काही स्टार्स आहेत, ज्यांचे आता बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे. पण बॉलीवूडमधील अशा सुपरस्टार्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या पदरी आलेल्या सुपरहिट चित्रपटांना किक मारली. या यादीत सलमान खान, शाहरुख खानपासून करीना कपूरपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

अक्षय कुमार

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने १९९३ मध्ये शाहरुख खानचा ‘बाजीगर’ चित्रपट नाकारला होता. या चित्रपटात निर्माते शाहरुख खानच्या आधी अक्षय कुमारला घेणार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 3 इडियट्स हा चित्रपट नाकारला आहे. त्याच्यानंतर आमिर खानला हा चित्रपट मिळाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याशिवाय मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगान सारखे सुपरहिट चित्रपट नाकारले.

संजय दत्त

या यादीत संजय दत्तच्या नावाचाही समावेश आहे. प्रभास आणि राणा दग्गुबती स्टारर बाहुबली मधील कट्टप्पाची भूमिका सर्वप्रथम संजय दत्तला ऑफर करण्यात आली होती. पण या चित्रपटात त्याने अभिनय केला नाही.

कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण जर तिने चेन्नई एक्सप्रेसची ऑफर स्वीकारली असती तर तिच्या हिट चित्रपटांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले असते. याशिवाय संजय लीला भन्सालीचा बाजीराव-मस्तानी, राम लीला, बर्फी, ये जवानी है दिवानी या चित्रपटांची ऑफर कॅटने नाकारली आहे.

आमिर खान

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान अतिशय मोजके चित्रपट स्वीकारतो, म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट नाकारला. ज्या चित्रपटाने शाहरुख खानला सुपरस्टार बनवले.

अजय देवगण

अजय देवगणचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्समध्ये गणले जाते. अजय देवगणनेही अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. १९९५ मध्ये आलेल्या ‘करण अर्जुन’ चित्रपटात अजय देवगण सलमान खानच्या भूमिकेत दिसणार होता, पण त्याने ही ऑफर नाकारली.

सलमान खान

सलमान भाईजानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्याने अनेक चित्रपट नाकारले देखील आहेत. त्यातील महत्त्वाचा चित्रपट होता, शाहरुख खानचा चक दे इंडिया! सलमानने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

हृतिक रोशन

हृतिक रोशन हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याने बॉलिवूड तसेच साऊथ आणि हॉलिवूड चित्रपट नाकारले आहेत. हृतिक रोशनला आमिर खानच्या ‘रंग दे बसंती’या चित्रपटाची ऑफर आली होती, मात्र ‘क्रिश’चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याने हा चित्रपट नाकारला होता. तसेच स्वदेश आणि दिल चाहता है यांसारख्या यशस्वी चित्रपटांना हृतिकने नाकारले होते.

करीना कपूर खान

सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरचे बॉलिवूडमध्ये खूप नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हम दिल दे चुके सनम हा चित्रपट ऐश्वर्याच्या आधी करिनाला ऑफर करण्यात आला होता, मात्र तिने या चित्रपटात काम केले नाही. याशिवाय नयना, राम लीला, कल हो ना हो, क्वीन यांसारखे चित्रपटही तिने नाकारले.