बॉलिवूडचे हे कलाकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द...

बॉलिवूडचे हे कलाकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतात एवढा टॅक्स, अव्वल क्रमांकावर आहे हा स्टार (These Bollywood Stars Pay So Much Tax To The Income Tax Department, This Bollywood Star Is At Number One)

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांमधून भरघोष म्हणजे अगदी खोऱ्याने पैसा कमावतात. या स्टार्सची फी लाखात नाही तर करोडोंमध्ये असते. जेवढी जास्त कमाई ते करतात, तेवढाच जास्त टॅक्सही त्यांना भरावा लागतो. ते दरवर्षी न चुकता कर भरण्यासाठी मोठी किंमत चुकवतात आणि खरे भारतीय होण्याचे कर्तव्य पार पाडतात. चला तर जाणून घेऊया, कोणते बॉलीवूड स्टार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सर्वाधिक कर भरतात.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अक्षय कुमार – २०२२ सालाच्या आकडेवारीनुसार, अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. अक्षय अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीही करतो. त्याला या वर्षातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळाले असून, त्यासाठी त्याचा सन्मानही करण्यात आला आहे. अक्षयने या वर्षी किती कर भरला हे उघड झाले नसले तरी त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २१३ कोटींहून अधिक आहे. अक्षय कुमार गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरणारा आहे आणि यावेळीही त्याने मनोरंजन उद्योगात सर्वाधिक कर भरला आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अमिताभ बच्चन – सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील भारताचे खरे नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडत सालाबादाप्रमाणे न चुकता कर भरतात. अमिताभ बच्चन यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७० कोटी रुपये आयकर विभागात जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट, टीव्ही क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ आणि जाहिरातींमधून मिळालेल्या भरमसाट फीमधून त्यांचा कर भरला गेला होता.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सलमान खान – सलमान खान हा त्याच्या चित्रपट निर्मात्याकडून फी घेत नाही तर चित्रपटातून होणाऱ्या नफ्याचा वाटा मागतो. त्यामुळे त्याचा बँक बॅलन्स खूप मोठा आहे. याशिवाय टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मधूनही सलमान भाईजानला बक्कळ पैसा मिळतो. मिळकत जेवढी जास्त तेवढा कर जास्त, या नियामानुसार सलमानही जवळपास ४४ कोटींचा टॅक्स भरतो.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

हृतिक रोशन – ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन मोजकेच चित्रपट करतो, पण जेव्हा तो चित्रपट करतो तेव्हा त्याच्या फीमुळे निर्मात्यांना घाम फुटतो. हृतिक हा अनेक मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे. त्यामुळे त्याचे वार्षिक उत्पन्नही उत्तम आहे. रिपोर्टनुसार, हृतिकने ४८ कोटींपर्यंत टॅक्स भरलेला आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

शाहरुख खान – देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खानचाही टॅक्स भरणाऱ्या सेलेब्सच्या यादीत समावेश आहे. अहवालानुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात त्याने सुमारे ७० कोटी रुपये आयकर म्हणून जमा केले आहेत.