मांसाहार सोडून शाकाहारी बनलेले फिल्मी सितारे (T...

मांसाहार सोडून शाकाहारी बनलेले फिल्मी सितारे (These Bollywood stars opted to be vegetarians. Know the reason)

Bollywood stars, vegetarians

बालपणापासून चवीने मांसाहारी पदार्थ खाणाऱ्या काही बॉलिवूड सिताऱ्यांनी त्यांचा त्याग केला. अन्‌ ते शुद्ध शाकाहारी बनले. काहींनी फिटनेस, तंदुरुस्ती यासाठी तर अन्य काहींनी प्राणीमात्रांवर दया दाखवण्यासाठी मांसमच्छी खाणं सोडलं आहे.

कंगना रणौत

Bollywood stars, vegetarians

प्रत्येक संकटांस खंबीरपणे सामोरी जाणारी कंगना रणौत आपल्या तब्येतीबाबत अतिशय जागरूक आहे. म्हणूनच तिने नॉन व्हेज पदार्थांचा त्याग केलेला आहे. शाकाहारी बनल्यानंतर आपल्या जीवनात काही चांगले बदल घडून आले, त्यामुळे आपण सुखी आहोत, असं तिचं म्हणणं आहे.

अमिताभ बच्चन

Bollywood stars, vegetarians

अमिताभ बच्चनचं वय बरंच झालं आहे. पण त्याचा काम करण्याचा उत्साह आणि फिटनेस पाहून थक्क व्हायला होतं. केवळ २५ टक्के निरोगी लिव्हर असून देखील बिग बी, आपलं जीवन सक्रीय, सकारात्मक आणि प्रेरक व्यतीत करत आहे. याचं श्रेय तो शाकाहारास देतो. वय वाढलं तरी क्रियाशील राहण्याबाबत शाकाहार कारणीभूत आहे, असं तो म्हणतो. पूर्वी तो मांसाहार करत होता. अल्कोहोल, चहा-कॉफी यांचं सेवन करत होता. पण काही वर्षांपूर्वीच त्यानं या साऱ्यांना रामराम ठोकला आहे. आता तो संपूर्ण शाकाहारी असून इतरांनाही तसेच राहण्याची सूचना करतो.

करीना कपूर

Bollywood stars, vegetarians

करीना कपूर देखील पूर्णतः शाकाहारी आहे. प्राणीमात्रांच्या सरंक्षणासाठी ती शाकाहारी बनली आहे. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, बऱ्याच वर्षांपूर्वी आपण नॉन-व्हेज पदार्थ सोडले आहेत. डाळ-भात, पोळी, भाजी असं साधं आणि तेही घरचं जेवण तिला जास्त आवडतं.

विद्या बालन

Bollywood stars, vegetarians

विद्या बालन ही तामिळ ब्राह्मण परिवाराची कन्या आहे. त्यामुळे ती सुरुवातीपासून शाकाहारी आहे. शाकाहारी पदार्थांनी आपण निरोगी राहतो व आपली कांती देखील सुंदर राहते, असं तिचं मत आहे. भाज्या खाल्ल्याने तर आपली त्वचा चमकते, असंही ती सांगते.

आलिया भट्ट

Bollywood stars, vegetarians

सध्याच्या घडीला, लहान वयातच मोठं यश आलिया भट्टने मिळवलं आहे. बऱ्याच आधी तिनं नॉन-व्हेज खाणं सोडलं असून ती एकदम व्हेजिटेरीयन आहे. अंगात उष्णता वाढते, म्हणून तिनं नॉन्‌-व्हेज सोडलं; असं बोललं जातं.

जॉन अब्राहम

Bollywood stars, vegetarians

दणकट शरीरयष्टी लाभलेला जॉन अब्राहम शाकाहारी आहे. प्राणीमात्रांवर त्याचं खूप प्रेम असल्यानं, त्यानं मांसाहार सोडून शाकाहारावर गुजराण ठेवली आहे.

रेखा

Bollywood stars, vegetarians

विविध प्राण्यांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या ‘पेटा’ या सामाजिक संस्थेने सर्वात लोकप्रिय शाकाहारी सेलिब्रिटी म्हणून रेखाची निवड केली होती. रेखा फार पूर्वीपासून शाकाहारी आहे. आपलं जीवन आणि विचार यांच्यावर शाकाहाराने मोठा फरक पडतो. अन्‌ शाकाहारी व्यक्ती जास्त चिंतन करू शकते; असं तिचं मत आहे.

शाहीद कपूर

Bollywood stars, vegetarians

२००३ सालापासून शाहीद कपूर शाकाहारी बनला आहे. ‘लाइफ इज फेअर’ हे ब्रेन हाइन्स लिखित पुस्तक वाचल्यावर त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. त्याचे पिताजी पंकज कपूर यांनी हे पुस्तक शाहीदला भेट दिलं होतं. ते वाचून त्याचे मतपरिवर्तन झाले अन्‌ तो शाकाहारी बनला. आता तर तो इतरांनाही शाकाहारी राहण्याचा सल्ला देत असतो.

सोनम कपूर

Bollywood stars, vegetarians

कित्येक वर्षांपूर्वी सोनम कपूरने मांसाहार सोडला आहे. एवढंच नव्हे तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील सोडले होते. शाकाहारी आणि हेल्दी डाएटवर आपण संतुष्ट आहोत, असं ती सांगते.

आमिर खान- किरण राव

Bollywood stars, vegetarians

आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानंतर आमीर खानने नॉन्‌ व्हेज सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो फक्त व्हेजिटेरियन जेवण करतो. नॉन-व्हेज खाल्ल्याने तब्येतीवर परिणाम होतो, हे लक्षात आल्यावर त्याने ते सोडलं. त्याची आधीची पत्नी किरण रावने देखील त्याचे अनुकरण करत शाकाहाराची कास धरली. किरणला जनावरांची हिंसा आवडत नाही.

अनुष्का शर्मा

Bollywood stars, vegetarians

आपल्या आवडत्या कुत्र्यासाठी अनुष्का शर्माने मांसाहार सोडला, अशी वंदता आहे. कारण तिच्या पाळीव कुत्र्याला मांसाचा वास आवडत नाही. म्हणून तिनंही मांस खाणं सोडलं आहे. शिवाय ती ‘पेटा’ या संस्थेची कार्यकर्ती आहे. इतकंच नव्हे तर अनुष्कानं, आपला नवरा क्रिकेटपटू विराट कोहली याला देखील शाकाहारी बनण्यास प्रेरीत केलेलं आहे.

जॅकलीन फर्नांडिस

Bollywood stars, vegetarians

जनावरांची हत्या जॅकलीन फर्नांडिसला मान्य नाही. त्यामुळे तिने मांसाहार सोडला. अन्‌ अंडी व डेअरी प्रॉडक्टस्‌ देखील सोडले आहेत. ‘पेटा’ या संस्थेनं २०१४ साली जॅकलीनला वूमन ऑफ द इअर हे पारितोषिक दिलं होतं. 

नेहा धुपिया

Bollywood stars, vegetarians

नेहा धुपिया देखील ‘पेटा’ या संस्थेशी संलग्न आहे. प्राणीमात्रांचे संरक्षण व्हावे, या विचारांची ती आहे. म्हणूनच ती शुद्ध शाकाहारी आहे.