वारंवार प्रेमरोग होऊन ३ ते ४ लग्नं केलेले बॉलिव...

वारंवार प्रेमरोग होऊन ३ ते ४ लग्नं केलेले बॉलिवूडचे नवरे (These Bollywood Stars Fell In Love Many Times And Married 3-4 Times)

खरं प्रेम एकदाच होतं, असा अनुभव आहे. किंबहुना पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं. पण बॉलिवूडच्या या काही कलावंतांना वारंवार प्रेमरोग जडलेला आहे. ज्याप्रमाणे यांना प्रेम अनेकदा झालेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी वारंवार लग्न करण्याचा सिलसिला चालू ठेवलेला आहे. त्यामुळे अनेकदा प्रेमरंगात रंगले आणि ३ ते ४ वेळा लग्नाच्या बेडीत अडकले, असा त्यांचा इतिहास घडला आहे.

किशोरकुमार

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हिंदी सिनेमाचे सदाबहार गायक आणि नायक किशोरकुमार याचा या प्रकरणात अव्वल नंबर आहे. कारण त्याला एक-दोनदा नाही तर ४ वेळा प्रेमरोग जडला आणि त्याची इतश्री ४ लग्नात झाली. १९५० साली त्याने रुमा गुहाशी पहिलं लग्न केलं. १९६० साली मधुबालाशी दुसरं लग्न केलं. तिच्या मृत्यूनंतर त्यानं योगिता बालीशी तिसरं लग्न केलं. हे लग्न फक्त २ वर्षे टिकलं. पुढे १९८० साली तो लीना चंदावरकर सोबत लग्नाच्या बोहल्यावर चढला.

विनोद मेहरा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

चित्रसृष्टीतील दिवंगत अभिनेता विनोद मेहराचं पहिलं लग्न मीना ब्रोका हिच्याशी झालं होतं. ते काही जास्त दिवस टिकलं नाही. मग त्यानं बिंदिया गोस्वामीशी दुसरं लग्न केलं. तिच्याशी देखील त्याला फार काळ जुळवून घेता आलं नाही. किरणशी त्यानं तिसरं लग्न केलं.

निलीमा अझीम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अभिनेता शाहीद कपूरची आई निलीमा अझीम देखील ३ लग्न करून चुकली आहे. चित्रसृष्टीतील दमदार कलावंत पंकज कपूरशी १९७५ साली लग्न केलं. त्यांना शाहीद कपूर झाला. मात्र शाहीदच्या जन्मानंतर तीन वर्षांनी हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर तिने १९९० मध्ये अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केलं. या संबंधातून निलीमाने इशान खट्टरला जन्म दिला. राजेशशी तिचे संबंध पुढे टिकले नाहीत. म्हणून निलीमाने रजा अली खानशी तिसरं लग्न केलं. अन्‌ २००९ साली निलीमा व रजा अली विलगही झाले.

कबीर बेदी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूड आणि हॉलिवूडचा अभिनेता कबीर बेदीची ४ लग्नं झाली आहेत. त्याचं पहिलं लग्न १९६९ साली बंगाली नर्तकी प्रोतिमा बेदीशी झालं होतं. असं म्हणतात की, त्याचवेळी त्याने मूळची ब्रिटीश असलेली, फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रीज हिच्याशी दुसरं लग्न केलं. या दोघींना घटस्फोट देऊन कबीरने निक्कीशी तिसरं लग्न केलं. हे नातं जास्त दिवस काही टिकलं नाही. तेव्हा आपल्या वयाच्या ७१व्या वर्षी कबीरने परवीर दुसांज हिच्याशी चौथं लग्न केलं.

कमल हसन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कमल हसनने १९७८ साली शास्त्रीय गायिका वाणी गणपती हिच्याशी पहिलं लग्न केलं. पण १० वर्षांनंतर ते वेगळे झाले. कारण तो अभिनेत्री सारिकाच्या प्रेमात पडला होता. म्हणून त्यानं सारिकाशी लग्न केलं. त्यापासून त्याला श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली झाल्या. तरीपण हे दोघे २००४ साली वेगळे झाले. त्यानंतर तो गौतमी या अभिनेत्री सोबत बरेच दिवस लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये राहिला, असं कळलं होतं. दोघांनी लग्न केलं. पण त्याची अधिकृत घोषणा केली नाही. २०१६ मध्ये कमल व गौतमी वेगळे झाले.

सिद्धार्थ रॉय कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर ३ वेळा लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. सिद्धार्थनी पहिलं लग्न बालपणीच्या मैत्रिणीशी केलं होतं. दुसरं लग्न एका टेलिव्हिजन निर्मातीशी केलं. २०११ साली या दोघांचा घटस्फोट झाला. अन्‌ मग त्यांनी विद्या बालनशी तिसरं लग्न केलं.

संजय दत्त

बॉलिवूडच्या संजूबाबाने तीन लग्नं केली आहेत. ऋचा शर्मा ही त्याची पहिली बायको होती. ती ब्रेन ट्यूमरच्या रोगाने मृत पावली. १९९८ साली त्याने मॉडेल रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं. पण २००५ साली त्यांचा घटस्फोट झाला. अन्‌ २००८ साली संजय दत्तने मान्यता दत्तशी लग्न केलं.

करण सिंह ग्रोवर

टी. व्ही. आणि सिनेमातील अभिनेता करण सिंह ग्रोवर हा देखील ३ वेळा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यानं २००८ साली टी. व्ही. अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केलं होतं. पण १० महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. मग त्याने जेनिफर विंगेट या सहकलाकाराशी दुसरं लग्न केलं. पण २ वर्षातच तिलाही घटस्फोट दिला. मग २०१६ साली त्यानं बिपाशा बसुशी लग्न केलं.