लग्न केले तरी निपुत्रिक राहिलेले बॉलिवूडचे सिता...

लग्न केले तरी निपुत्रिक राहिलेले बॉलिवूडचे सितारे (These Bollywood Stars Could Not Become Parents After Marriage)

आज जग कुठल्या कुठे गेलेलं असलं तरी, प्रत्येक विवाहित जोडप्याची आपल्याला एखादं तरी मुल असावं, आपण आई-बाबा व्हावं अशी इच्छा असते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण भाग असतो. किंबहुना अशीही काही जोडपी आहेत, ज्यांना लग्नानंतर मूल झाले नाही, तरीही ते सुखाने संसार करत आहेत. या लेखामध्ये आपण बॉलिवूडच्या अशा जोडप्यांबद्दल जाणून घेऊया जे पालक बनू शकले नाहीत आणि तरीही त्यांच्या जीवनात ते आनंदी आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

विद्या बालन – सिद्धार्थ रॉय कपूर – बॉलिवुडच्या या उभयतांचं लग्न २०१२ साली झालं होतं. दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश आहेत. मध्यंतरी विद्या बालन गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण त्यात काही तथ्य नव्हतं. एकदा मुलाखतीमध्ये तिने स्पष्टच सांगितलं होतं की, ही माझ्या आणि माझ्या पतीमधील गोष्ट आहे. आम्हाला मूल झालं नाही, यात वाईट काहीच नाही.  

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

कविता कौशिक – रोनित विस्वास – २०१७ साली कविता कौशिकने रोनित विस्वाससोबत लग्न केले. यांच्या लग्नाला ४ वर्षे झाली तरी त्यांच्याकडून मुलांबाबतची गोड बातमी अद्याप तरी आलेली नाही. याविषयी एका मुलाखतीत तिने सांगितले की, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आणखी एका मुलाची भर घालण्यात मला अजिबातच रस नाही. ती तिच्या मांजरींसोबत खुश आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

किरण खेर – अनुपम खेर – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेहमी आनंदी दिसणारं जोडपं अनुपम खेर आणि किरण खेर हे सगळ्यांचं आवडतं आहे. चंदीगढला ते दोघं पहिल्यांदा भेटले. त्यावेळेस त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर दोघंही आपापल्या वाटेने पुढे गेले. पंरतु काही कारणांनी दोघांचेही पहिले लग्न टिकू शकले नाही आणि १९८५ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. खरं म्हणजे किरण खेरला तिच्या पहिल्या लग्नानंतर मुलगा झाला आहे. तो आता त्यांच्यासोबतच राहत असून अनुपम खेरने त्यास वडिलांचं नाव दिलं आहे. परंतु अनुपम व किरण यांनी स्वतःचं मूल होऊ दिले नाही.  

जावेद अख्तर – शबाना आजमी – १९८४ मध्ये लग्न करतानाच आपण मूल होऊ द्यायचे नाही, असे या जोडप्याने ठरवले होते. मात्र जावेद अख्तर यांनी हनी ईरानीसोबत पहिलं लग्न केलं आणि त्यांना दोन मुलंही आहेत.

सायरा बानो – दिलीप कुमार – दिवंगत अभिनेता दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी प्रत्येक जोडप्यासाठी आदर्शवत आहे. त्यांनी १९६६ साली लग्न केलं. त्यांना मुल झालं नाही. परंतु सुपरस्टार शाहरुख खानला ते आपल्या मुलाप्रमाणे मानत होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम