श्रद्धापूर्वक घरी गणपती आणणारे कलावंत (These Bo...

श्रद्धापूर्वक घरी गणपती आणणारे कलावंत (These Bollywood Stars Celebrate Ganeshotsav With Devotion)

आजपासून गणेशोत्सवाचे पवित्र पर्व सुरू झाले आहे. बॉलिवूडचे काही टॉपचे सितारे पक्के गणेश भक्त आहेत. ते दरवर्षी घरी गणपती आणून थाटामाटात गणेशोत्सव साजरा करतात.

सलमान खान

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सिताऱ्यांच्या यादीत सलमान खानचं नाव फारच वर आहे. त्याच्या परिवारात सर्व धर्मांचा आदर केला जातो. सलमान, त्याचे वडील सलीम खान, आई व कुटुंबातील सगळे जण गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात. सलमानच्या राहत्या घरी, म्हणजे गॅलॅक्सी अपार्टमेन्टमध्ये आधी गणपती आणला जायचा. पण त्याची बहीण अर्पिताने लग्न झाल्यावर आपल्या घरी गणपती नेला आहे. तिथे सलमानचे सर्व कुटुंब जमते. सलमान कितीही बिझी असला तरी ते सर्व सोडून तो गणपती बाप्पाची पहिली आरती कधीच चुकवत नाही.

सोनू सूद

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

गेल्या २० वर्षांपासून सोनू सुद त्याच्या घरी गणपती आणतो आहे. त्याचा गणपती ५ दिवसांचा असतो. या दिवसात सोनू, त्याची पत्नी सोनाली आणि २ मुले श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजाअर्चा करतात. “लोकांना खूप कठीण प्रसंगातून जावे लागत आहे. गणपती बाप्पा आपली सर्व विघ्ने दूर करील. अशी मला खात्री आहे,” असे सोनूने यंदा जाहीर केले आहे.

शिल्पा शेट्टी

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

शिल्पा शेट्टी दरवर्षी घरी गणपती आणून धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करते. तिचा गणपती दीड दिवसांचा असतो. यंदा तिचा पती राज कुंद्रा तुरुंगात अडकला आहे. तरीपण शिल्पाने गणपती बाप्पाच्या सेवेत काही कमी केलेले नाही.

विवेक ओबेरॉय

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

अतिशय हर्षोल्हासात विवेक ओबेरॉयच्या घरी श्री गणेशाचे आगमन मंगलमय होऊन जाते. स्वतः विवेक, त्याचे वडील सुरेश ओबेरॉय, आई वसुंधरा आणि २ मुले मिळून गणपती बाप्पाची सेवा करून आशीर्वाद घेतात.

जितेन्द्र

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

मूळचा गिरगावकर असलेला जितेन्द्र श्री गजाननास श्रद्धापूर्वक घरी आणतो. त्याचा संपूर्ण परिवार विधिवत गणपतीची पूजा करतात. गणेशभक्त असलेली एकता कपूर या निमित्ताने घरी छोटीशी पार्टी आयोजित करते. त्याला सिनेमा व टेलिव्हिजन सृष्टीतील कलावंत आवर्जून हजर राहतात.

गोविंदा

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

गोविंदा चांगलाच गणेश भक्त आहे. त्याच्याकडे दरवर्षी पूर्ण १० दिवसांचा गणपती असतो. आपली सर्व कामे बाजूला सारून गोविंदा गणेश भक्तीमध्ये रमून जातो.

नाना पाटेकर

Bollywood Stars Celebrate Ganeshotsav

नाना पाटेकरच्या घरचा गणपती पूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्याचा गणपती १० दिवसांचा असतो. या १० दिवसांत त्याच्या घरात खूप गजबज असते. त्याच्या गणपतीची फुलांची सजावट प्रसिद्ध आहे. ती व पूजाअर्चा नाना स्वतः करतो.