मोठमोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे मालक आहेत हे बॉलिवूड...

मोठमोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे मालक आहेत हे बॉलिवूड कलाकार (These Bollywood Stars Are The Owners Of Big Production Houses, Earn A Lot)

बॉलिवूड कलाकार चित्रपट आणि ब्रँड एंडॉर्समेंटसोबतच साइड बिझनेसमधूनही भरपूर कमाई करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतात. चला जाणून घेऊया अशा सेलिब्रिटींबद्दल जे अभिनयासोबतच प्रॉडक्शन हाऊसचे मालक बनून भरपूर कमाई करतात.

आमिर खान

 मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच स्वत:चे प्रोडक्शन हाऊसही चालवतो. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘आमिर खान प्रोडक्शन’ असे आहे. 1999 मध्ये त्याने या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘लगान’ आणि ‘दिल्ली बेली’ या चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

अक्षय कुमार

 चाहत्यांमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमारही केवळ चित्रपटांमध्येच काम करत नाही तर तो स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही चालवतो. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘हरी ओम एंटरटेनमेंट’ आहे. ‘ओ माय गॉड’ हा चित्रपट याच प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला होता.

फरहान अख्तर

 सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरही स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतो. त्याच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ‘दिल धडकने दो’, ‘गली बॉय’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती झाली होती. फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ आहे.

शाहरुख खान

किंग खान आणि बादशाह या नावांनी प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘रेड चिलीज’ एंटरटेनमेंट आहे. शाहरुख हे प्रॉडक्शन हाऊस आपली पत्नी गौरी खानसोबत चालवतो. या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत ‘रावण’, ‘ओम शांती ओम’, ‘डियर जिंदगी’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांची निर्मिती झाली होती.

सलमान खान

 चाहत्यांमध्ये दबंग खान आणि भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमान खानने 2011 मध्ये ‘सलमान खान फिल्म’ हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. या प्रॉडक्शनअंतर्गत सलमानने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली खास ओळख निर्माण करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा बिझनेस करण्यातही पटाईत आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘पर्पल पैपल पिक्चर’ आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का आपला भाऊ कर्णेशसोबत ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. 2013 मध्ये त्यांनी याची सुरुवात केली. अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत ‘NH 10’, ‘परी’ आणि ‘फिल्लौरी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.