बॉलिवूडचे हे कलाकार अभिनयासोबतच आहेत खेळातील मह...

बॉलिवूडचे हे कलाकार अभिनयासोबतच आहेत खेळातील महारथी (These Bollywood stars Are Great In Acting As Well As In Sports)

बॉलिवूड कलाकार हे केवळ अभिनयातच उजवे आहेत असे नाही. तर इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासोबतच खेळांमध्येही आपले नाव कमावले आहे. खेळ शरीराला तंदूरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी असतात. आणि जर तुम्हाला मोठ्या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा भाग व्हायचा असेल तर मग तुम्हाला शरीर फिट आणि तंदुरुस्त ठेवणे गरजेचे असते.

रणबीर कपूर

रणबीर कपूरचे फुटबॉलवरील प्रेम त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहित असेल. त्याने स्वतः ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे. इतकंच नाही तर रणबीरची स्वतःची फुटबॉल टीम आहे. या टीमला ASFC म्हणून ओळखले जाते. या टीम अंतर्गत रणबीरने अनेक सामने खेळले आहेत. रणबीर खेळताना 8 क्रमांकाची जर्सी वापरतो. त्याला बालपणापासूनच फुटबॉलची खूप आवड आहे.

कार्तिक आर्यन

 बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला सुद्धा फुटबॉलमध्ये खूप रस आहे. तो ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचा सदस्य आहे.कार्तिकचे अभिनय कौशल्य तर सर्वांनाच माहित आहे.पण त्याची ही नवी आवड ऐकल्यानंतर नक्कीच सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला असेल.

दीपिका पदुकोण

 प्रकाश पदुकोण हे भारतातील बॅडमिंटनपटूंमधील दिग्गजांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांची मुलगी अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही पहिले प्रेम बॅडमिंटन होते. दीपिकाने पीव्ही सिंधूसोबत सामने खेळले आहेत. त्यानंतर पीव्ही सिंधूने तिची खूप प्रशंसा केली होती.

तापसी पन्नू

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना क्लीन बोल्ड करणाऱ्या तापसी पन्नूने अनेक चित्रपटांमध्ये स्पोर्ट्स गर्लची भूमिका साकारली आहे. ती केवळ चित्रपटांमध्येच खेळ खेळताना दिसते असे नाही, तर खऱ्या आयुष्यात ती स्क्वॅश खेळण्यात पारंगत आहे.