आधी कैक तरुणांना झुलविले आणि मग संसारात रमलेल्य...

आधी कैक तरुणांना झुलविले आणि मग संसारात रमलेल्या बॉलिवूड सुंदरी (These Bollywood Beauties Broke The Hearts Of Many Boys, Now Settled By Getting Married)

बॉलिवूडमध्ये लिंकअप्स्‌ आणि ब्रेकअप्स्‌ यांच्या बातम्या नित्य येत असतात. इथे काही कलाकार असे आहेत, जे वारंवार प्रेमात पडत गेले. त्यामुध्ये इथल्या सुंदरी मागे नाहीत. त्यांनी कैक तरुणांना झुलविले, अन्‌ नंतर मात्र संसारात रमल्या. ही यादी मोठी आहे, पण या ठिकाणी निवडक धोका दिलेल्या किंवा धोका खाल्लेल्या सुंदरींचा समाचार घेऊयात.

सुश्मिता सेन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या बयेनं अलिकडेच आपला बॉयफ्रेंड रोहमन शॉलशी फारकत घेतली. सोशल मीडियावर त्याचा डंका वाजवला. सुश्मिता आणि हा रोहमन, गेल्या ३ वर्षांपासून डेट करत होते. याआधी या बयेनं किमान १० लोकांवर प्रेम केलं आणि मग त्यांना सोडून दिलं. या यादीत रणदीप हुडा, विक्रम भट अशी नावे सापडतील.

प्रियंका चोप्रा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रियंका चोप्राने देखील कित्येक उमद्या तरुणांना प्रेमभंगाचे दुःख दिले आहे. शाहिद कपूर ते शाहरूख खान इत्यादींबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. हरमन बावेजा सोबत तिच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. पण या सर्व भारतीय तरुणांच्या हृदयाला घरे पाडून तिने हॉलिवूड स्टार निक जोनसशी दिलजमाई केली. अन्‌ त्याला लग्नाच्या बेडीत अडकवून, आज मजेत जीवन जगते आहे.

दीपिका पादुकोण

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तरुणांचा हृदय भंग करण्याच्या बाबतीत दीपिका पादुकोण मागे नाही. रणवीर सिंहशी आधी प्रेम आणि नंतर लग्न रचणाऱ्या या सुंदरीचे नाव आधी रणबीर कपूरशी जोडले गेले होते. त्यांचा ब्रेकअप झाला. सिद्धार्थ माल्या, युवराज सिंह, उपेन पटेल, निहार पांड्या या तरुणांशी देखील तिचं नाव जोडलं गेलं होतं. आता मात्र रणबीरशी लग्न करून ती सेटल्‌ झाली आहे.

ऐश्वर्या राय

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री गणली गेलेली ऐश्वर्या राय, हिच्यावर तर कोणीही प्रेम करील. तिचं नाव मात्र सलमान खानसोबत जास्त जोडलं गेलं होतं. त्याला सोडून विवेक ओबेरॉय सोबत देखील तिचं नाव जोडलं गेलं. त्यालाही तिनं सोडलं आणि अभिषेक बच्चनशी लग्न करून सुखाने संसार करते आहे.

बिपाशा बसु

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अभिनेता जॉन अब्राहम सोबत बिपाशा बसुचे मधुर संबंध बराच काळ टिकले होते. दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले होते. पण काही मतभेद झाले अन्‌ ते वेगळे झाले. जॉन अब्राहमच्या आधी, डिनो मोरियाशी देखील बिपाशाचे नाव जोडले गेले होते. आता मात्र लग्न करून तिनं आपला संसार थाटला आहे.

कतरिना कैफ

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अलिकडेच कतरिनाने विकी कौशलशी थाटात लग्न केलं. विकीच्या आधी या तरुण अभिनेत्रीचं नाव रणवीर कपूर व सलमान खानशी जुळलं होतं. यांच्याशिवाय सिद्धार्थ माल्यासोबत  तिच्या मधुर संबंधांचीही बरीच चर्चा झाली होती.