कमी वयात बोहल्यावर चढलेल्या अभिनेत्री (These Bo...

कमी वयात बोहल्यावर चढलेल्या अभिनेत्री (These Bollywood Actresses Were Married At An Early Age)

सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची बरीच चर्चा आहे. 15 एप्रिलला हे प्रेमी युगुल लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आलियाने कमी वयातच बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती आता 29 वर्षांची आहे. इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी वयात लग्न केले. पाहूयात या अभिनेत्री कोण आहेत.

नीतू कपूर
आलियाच्या सासूबाई नीतू कपूरने वयाच्या 21 व्या वर्षीच ऋषी कपूरसोबत लग्न केले होते. नीतू आणि ऋषी यांनी 1980 मध्ये प्रेमविवाह केला होता. नीतू यांनी ऋषीसोबत लग्न केले तेव्हा त्या इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या, पण लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले होते.

डिंपल कपाडिया
या यादीत डिंपल कपाडियाचेही नाव आहे. डिंपलने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले होते. याच काळात तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. दोघांचे लग्न 1973 मध्ये झाले होते. त्यावेळी डिंपल फक्त 16 वर्षांची होती. अन् दोघांच्या वयात 16 वर्षांचे अंतर होते.

भाग्यश्री
‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री भाग्यश्रीने वयाच्या 21 व्या वर्षी बॉयफ्रेंड हिमालयशी लग्न केले होते. शाळेच्या दिवसांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. भाग्यश्रीचे आई-वडील या नात्यासाठी तयार नव्हते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते.

बबिता
करीना – करिश्मा यांची आई बबिता यांनी देखील वयाच्या 23 व्या वर्षी रणधीर कपूरसोबत लग्न केले होते.  6 नोव्हेंबर 1971 रोजी दोघांचे लग्न झाले होते.

दिव्या भारती
1992 मध्ये दिव्या भारतीन बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला सोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी ती फक्त 18 वर्षांची होती, पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर दिव्याचा गुढ स्थितीत मृत्यू झाला होता.

सायरा बानो
70च्या दशकातील प्रसिद्ध जोडी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे 11 ऑक्टोबर 1966 रोजी लग्न झाले होते. त्यावेळी सायरा 22 आणि दिलीप 44 वर्षांचे होते. वयाच्या 12 व्या वर्षी सायरा बानो दिलीप यांच्या प्रेमात पडल्या होत्या.