नव्वदीच्या दशकातील या टॉपच्या अभिनेत्री सध्या क...

नव्वदीच्या दशकातील या टॉपच्या अभिनेत्री सध्या काय करताहेत? (These Bollywood Actresses In The Nineties Used To Rule Every Heart : Know What They Are Doing Nowadays?)

बॉलिवूडमध्ये नव्वदीच्या दशकात या काही अभिनेत्रींनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं . आपला अभिनय आणि ग्लॅमरस रुपर्शनाने त्यांनी मोठं नाव कमावलं. त्यापैकी काही दूर गेल्या, तर काही अजून काम करताहेत.

रविना टंडन

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
नव्वदीच्या दशकात आपले सौंदर्य आणि अभिनय गुण याच्या जोरावर रविना टंडन टॉपवर होती. आता ती फिल्मी दुनियेपासून दूर राहत असली तरी ब्रॅन्ड प्रमोशन करते आहे. त्याचप्रमाणे डान्स रिऍलिटी शो मधून ती परीक्षक म्हणून दिसली आहे.

महिमा चौधरी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘परदेस’ या चित्रपटातून पदार्पण करणारी महिमा चौधरी बऱ्यापैकी टॉपवर होती. पण नंतर काही चित्रपट केल्यावर ती अचानक गायब झाली. एका मुलाखतीत महिमानं  सांगितलं की, ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तिला मोठा अपघात झाला. अन तिचं जीवन बदलून गेलं. सध्या ती या इंडस्ट्रीपासून लांबच आहे.

मनीषा कोइराला

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
मनीषा कोइरालाने एकाहून एक सरस चित्रपट केलेत. रणबीर कपूर अभिनित ‘संजू’ या चित्रपटात, काही दिवसांपूर्वी, ती नर्गिस दत्तच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती नेटफ्लिक्सच्या काही आगामी प्रोजेक्टस्मध्ये व्यस्त आहे.

जुही चावला

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
जुही चावलाने देखील हे दशक चांगलेच गाजवले होते. आता ती चित्रपटांपासून दूर आहे. पण तिने शाहरुख खानसोबत कोलकत्ता नाईट रायडर्स या क्रिकेट संघावर पैसे लावले आहेत. शिवाय ड्रीमज अनलिमिटेड नावाच्या निर्मिती संस्थेची ती मालकीण आहे.

पूजा बात्रा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
पूजा बात्रा उंचीने ताडमाड असलेली पूजा बत्रा  सिनेरसिकांच्या स्मरणात अद्याप आहे. काही वर्षांपासून ती सिनेमात दिसलेली नाही. पण चॅरिटीसाठी ती बरंच काम सध्या करते आहे.

प्रीती झिंटा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
त्या काळात प्रीती झिंटाच्या सौंदर्यावर सिनेरसिक फिदा झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती या सृष्टीपासून लांब गेली आहे. पण तिने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. आयपीएल स्पर्धेच्या किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची ती संयुक्त मालकीण आहे.