लैंगिक शोषणास बळी पडलेल्या बॉलिवूड अभिनेत्री (T...

लैंगिक शोषणास बळी पडलेल्या बॉलिवूड अभिनेत्री (These Bollywood Actresses Have Become Victims Of Exploitation : You Will Be Stunned To Know)

ही दुनिया भल्याबुऱ्या लोकांनी भरलेली आहे. त्यात पुन्हा मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्यांची संख्या कमी नाही. वाईट चालीच्या लोकांशी सामना केला नाही, अशी मुलगी इथे क्वचितच आढळेल. काही मुली त्यांच्या या हरकतींना सख्त विरोध करतात, तर काही बिचाऱ्या मुकाटपणे त्यांचे चाळे सहन करतात. अशा लोकांच्या कचाट्यातून बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील सुटलेल्या नाहीत. लैंगिक शोषणास बळी पडलेल्या अशा काही अभिनेत्रींच्या या आहेत धक्कादायक कथा.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

दीपिका पादुकोण

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

एकेकाच्या मानसिक स्वास्थ्याबाबत दीपिका पादुकोणने वेळोवेळी आपले विचार प्रकट केले आहेत. आपल्यावर गुदरलेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख देखील तिने केला आहे. दीपिकाने सांगितले होते, “मी १४-१५ वर्षांची होते. माझ्या कुटुंबासोबत मी हॉटेलात गेले होते. तिथून बाहेर पडताना माझी बहीण व वडील पुढे चालले होते. तर मी आणि आई मागून चालत होतो. अचानक एक मुलगा आला, त्याने मला मागच्या बाजूने स्पर्श केला आणि पळू लागला. ही काही फार गंभीर बाब नाही, म्हणून मी सोडून देऊ शकत होते पण तसं न करता, मी त्याची कॉलर पकडली आणि थोबाडीत ठेवून दिली.”

सुश्मिता सेन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुश्मिता सेनवर देखील असाच प्रसंग गुदरला होता. तिने घडलेला प्रसंग सांगितला, “एका इव्हेंटच्या दरम्यान १५ वर्षाच्या मुलाने तिची छेडखानी केली. तेव्हा मी त्याला पकडले. त्याचं लहान वय म्हणून मी काही कारवाई केली नाही. पण त्याची कॉलर पकडून मी त्याला लोकांसमोर  उभा केला. अन्‌ सांगितलं की, तुझी तक्रार केली, तर आयुष्य बरबाद होईल.”

सोनम कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडच्या या सर्वाधिक स्टायलिश नटीला पण असंच शोषण सोसावं लागलं होतं. आपण १३ वर्षाचे असताना, एका व्यक्तीनं अश्लील चाळे केले असल्याचे ती सांगते. “मी मित्रांसोबत जात होते, तेव्हा एका माणसानं मागून मला वाईट पद्धतीनं स्पर्श केला. तेव्हा मी अतिशय घाबरले. त्यावेळी मी काहीच बोलले नाही. मीच काहीतरी चुकीचं वागले, असं मला त्यावेळी वाटलं होतं,” असं सोनम म्हणते.

फातिमा सना शेख

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘दंगल’ या चित्रपटातून चमकलेली फातिमा सना शेख अशाच घटनेची बळी ठरली होती. आपण ३-४ वर्षांचे होतो, तेव्हाच ही अप्रिय घटना घडली असल्याचे ती सांगते.

स्वरा भास्कर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

स्वरा भास्करने सांगितले आहे की, अवती भवती सुरक्षा असून देखील तिच्याशी छेडखानी झाली. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या शूटिंगला जातेवेळी राजकोट विमानतळावर तिच्याशी अतिप्रसंग झाला. या प्रसंगाने ती फारच घाबरली होती. अनुपम खेर तेव्हा, तिच्या मदतीला धावून गेला होता.