चित्रपटात विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या अभिनेत्री ...

चित्रपटात विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या अभिनेत्री : रेखा ते दिपिका पदुकोण यांची नावे आहेत यादीत (These Bollywood Actresses Had Extra Marital Affairs In Films : Names Include Rekha To Deepika Padukone)

बॉलिवूडच्या चित्रपटात प्रेम, प्रेमाचा त्रिकोण आणि ऍक्शन यांचा भडिमार असतो. त्याच प्रमाणे काही चित्रपटांतून अनैतिक संबंधाच्या कथा देखील मांडण्यात आल्या आहेत. बॉलिवूडच्या  काही अभिनेत्रींनी या विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या नायिकांच्या भूमिका कौशल्याने रंगविल्या आहेत.


दिपिका पदुकोण
दिपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गहराइयां ‘ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. त्यामध्ये पती-पत्नी आणि वो, हिची प्रतारणा दाखविण्यात आली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
प्रियंका चोप्रा
‘ऐतराज’ या चित्रपटात करीना कपूर, प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रियंका चोप्रा अक्षयवर एकतर्फी प्रेम करते, असे तिचे पात्र होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


मल्लिका शेरावत
‘मर्डर’ या चित्रपटात इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांच्या मध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. मल्लिका विवाहित असून ती इमारनच्या प्रेमात पडते. या दोघांचे बोल्ड सीन हा त्यावेळी चर्चेचा विषय झाला होता.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रेखा
‘आस्था’ या चित्रपटात रेखा सोबत ओम पुरी आणि नविन निश्चल होते. विवाहबाह्य संबंध आणि विवाहित नायिकेचा व्यभिचार असे याचे कथासूत्र होते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यातील विवाहबाह्य संबंधाचे कथासूत्र ‘सिलसिला’ मध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले होते. या चित्रपटाच्या स्मृती प्रेक्षकांमध्ये अद्याप ताज्या आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम