बॉलिवूडच्या या अभिनेत्री, आपल्या नवऱ्यापेक्षा ज...

बॉलिवूडच्या या अभिनेत्री, आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमाई करतात (These Bollywood Actresses Earn More Than Their Husbands)

अनेक यशस्वी बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसाठी करोडो रुपये घेतात. कमाईच्या बाबतीत ते एखाद्या मोठ्या उद्योगपतीपेक्षा कमी नाहीत. सिनेतारकांची जीवनशैली पाहता, त्यांना चित्रपटातून किती पैसे मिळत असतील, याचा अंदाज येतो. बॉलिवूडमध्ये अभिनेते हे अभिनेत्रींपेक्षा जास्त कमावतात, असा तुम्ही विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण बॉलिवूडच्या टॉप हिरोइन्स कमाईच्या बाबतीत मोठ्या कलाकारांशी स्पर्धा करताना दिसतात. मात्र या लेखात आपण अशा अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत की ज्या आपल्या नवऱ्यांपेक्षा जास्त कमावतात.

ऐश्वर्या राय बच्चन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

माजी जगत्‌ सुंदरी आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं सौंदर्य जगजाहिर आहे. ॲशने २००७ मध्ये ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चनशी लग्न केलं. लग्नानंतर ॲशने कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपट साइन करणे बंद केले असले तरी तिची कमाई मात्र कमी झालेली नाही. कमाईच्या बाबतीत ती आपल्या पतीपेक्षा खूप पुढे आहे. होय, अॅशची एकूण संपत्ती २२७ कोटी रुपये आहे, तर अभिषेकची संपत्ती २०३ कोटी आहे.

कतरीना कैफ

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ तिच्या एका चित्रपटासाठी करोडोंची फी घेते. नुकतेच कतरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न केले. कतरिनाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती या बाबतीत तिचा पती विकी कौशलपेक्षा खूपच पुढे आहे. कतरिनाची एकूण संपत्ती २२४ कोटी रुपये आहे, तर विकी कौशलची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे.

दीपिका पादुकोण

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पतीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचे नाव देखील सामील आहे, कारण दीपिका ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिकाची एकूण संपत्ती ३१६ कोटी आहे, तर तिचा पती रणवीर सिंग जवळपास २२५ कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

बिपाशा बसु

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलिवूडची ब्लॅक ब्युटी अर्थात बिपाशा बसूने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. बिपाशाने लग्नानंतर चित्रपट करणे कमी केले असले तरी संपत्तीच्या बाबतीत ती पती करणपेक्षा खूप पुढे आहे. बिपाशाची एकूण संपत्ती ११३ कोटी रुपये आहे, तर करण सिंग ग्रोव्हर १३ कोटींच्या एकूण संपत्तीचा मालक आहे.

सोहा अली खान

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा अली खान ही पतौडी घराण्याशी संबंधित आहे. सोहाच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे, तर तिचा पती कुणाल खेमू या बाबतीत खूपच मागे आहे. सोहा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे, असे असूनही तिच्याकडे अफाट संपत्ती आहे, तर तिचा पती कुणाल खेमूची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे.