पदार्पणात रातोरात स्टार बनलेल्या या अभिनेत्रींच...

पदार्पणात रातोरात स्टार बनलेल्या या अभिनेत्रींचे पुढचे चित्रपट झाले सुपर फ्लॉप (These Bollywood Actresses Became Stars With Their Debut Film, But Super Flop in Later Films)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक टॉप अभिनेत्री आहेत, ज्यांच्या करीअरची सुरुवात फ्लॉप चित्रपटाने झाली होती. परंतु नंतर त्यांनी हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्यामुळे त्या रातोरात स्टार झाल्या होत्या मात्र नंतरच्या चित्रपटांमध्ये त्यांची जादू प्रेक्षकांवर चालली नाही त्यामुळे त्यांचे नंतरचे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले.

नरगिस फाखरी

‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाखरीला आपला पहिला चित्रपट खूप लकी ठरला होता. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले, पण पहिला चित्रपट सोडला तर इतर कोणत्याही चित्रपटात नर्गिस प्रेक्षकांना विशेष खुश करू शकली नाही.

भाग्यश्री

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात सुमनची भूमिका साकारून भाग्यश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले, मात्र नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

भूमिका चावला

‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानसोबत डेब्यू करणारी अभिनेत्री भूमिका चावला रातोरात स्टार बनली. या चित्रपटातील भूमिकाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती, त्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली, पण नंतरच्या चित्रपटांमध्ये भूमिकाच्या नशिबाने साथ दिली नाही.

स्नेहा उल्लाल

माजी मिस वर्ल्ड आणि सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय सारखी दिसणारी स्नेहा उल्लालने सलमान खानसोबत ‘लकी’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाने स्नेहा उल्लालचे नशिब पालटले. त्यानंतर स्नेहा आणखी चित्रपटांमध्ये दिसली, पण त्यावेळी तिची जादू प्रेक्षकांवर चालू शकली नाही.

अनु अग्रवाल

अभिनेता राहुल रॉयसोबत ‘आशिकी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अनु अग्रवालला या चित्रपटातून नाव आणि प्रसिद्धी मिळाली. पहिल्याच चित्रपटामुळे ही अभिनेत्री 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली होती, परंतु त्यानंतर तिची फिल्मी कारकीर्द काही खास चालली नाही.

मंदाकिनी

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात आपल्या धाडसी अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारी आकर्षक अभिनेत्री मंदाकिनीही आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातूनच प्रसिद्धीच्या झोतात आली. पण मंदाकिनीची जादू या हिट चित्रपटानंतर फारशी कमाल दाखवू शकली नाही.