रणवीर सिंहच्या आधी या अभिनेत्यांनीही केले आहे न...
रणवीर सिंहच्या आधी या अभिनेत्यांनीही केले आहे न्यूड फोटोशूट (These Bollywood Actors Have Come Into Limelight by Their Nude Photoshoots Before Ranveer Singh)

काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंहचे काही न्यूड फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवरुन त्याला खूप ट्रोल केले जात आहे. रणवीरने ते फोटोशूट एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी केलेले. पण आता ते शूट त्यांच्या अंगाशी आले असे म्हणावे लागेल. कारण रणवीर आता या प्रकरणात चांगलाच अडकला आहे.
रणवीरच्या या न्यूड फोटोंचा वाद वाढतच चालला आहे. त्याच्या विरोधात मुंबईतील चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तसेच त्याच्या अटकेचीही मागणी होत आहे. रणवीर विरुद्ध आयपीसीच्या कलम 509, 292,294 आणि आयटी कायद्याच्या कलम 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे असले तरी न्यूड फोटोशूट केलेला रणवीर हा एकमेव बॉलिवूड अभिनेता नाही. याआधीही अनेक कलाकार त्यांच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत. स्वत: कलाकारांनीही त्यांचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत, परंतु त्यांच्या फोटोंबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा तक्रार करण्यात आली नसल्याचे रणवीरच्या फोटोंना समर्थन देणाऱ्या व्यक्तींनी म्हटले आहे.
आलिया भट्ट, अर्जुन कपूर, उर्फी जावेद आणि पूनम पांडे यांसारख्या कलाकारांनी रणवीर सिंहला सपोर्ट केला आहे. आज आम्ही तुम्हाला न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत. न्यूड फोटोशूट करणाऱ्या कलाकारांमध्ये राहुल खन्ना, जॉन अब्राहम आणि मिलिंद सोमण यांसारख्या अभिनेत्यांची नावे सहभागी आहेत.
जॉन अब्राहम
बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम देखील त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. जॉनने 2021 मध्ये कपड्यांशिवाय न्यूड फोटोशूट केले होते, ज्यामध्ये त्याने न्यूड अवस्थेत उशीसह सोफ्यावर बसून कॅमेरासाठी पोज दिली होती. या फोटोमुऴे तो चर्चेत आला होता.
राहुल खन्ना
रणवीर सिंगच्या आधी अभिनेता राहुल खन्ना यानेही त्याचे न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक न्यूड लूक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये राहूल कपड्यांशिवाय सोफ्यावर बसलेला. त्याने शूज आणि मोजे घालून कॅमेरासमोर पोज दिली. त्याच्या त्या फोटोचे चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कौतुक केले होते.
मिलिंद सोमण
Keep seeing this pop up on my timelines every once in a while 🙂 its 25 years old, no social media no internet either I think ! wonder what the reaction would have been if it had been released today 😋 pic.twitter.com/uOvPAGCm6q
— Milind Usha Soman (@milindrunning) May 17, 2020
खरेतर मिलिंद सोमणने न्यूड फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी मिलिंद सोमणने मिस इंडिया मधु सप्रेसोबत न्यूड फोटोशूट केले होते. त्यावेळी त्यांनी गळ्यात अजगर आणि फक्त शूज घालून कॅमेऱ्यासाठी पोज दिली होती. तसेच 1991 मध्येही त्यांनी एक फोटोशूट केले होते ज्यात त्यांनी कपडे न घालता फोटो काढले होते. तसेच त्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी एक न्यूड फोटो शेअर केला होता. ज्यात ते समुद्रकिनारी कपडे न घालता धावत होते.