बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी गाजवलं सरतं वर्ष…( ...

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी गाजवलं सरतं वर्ष…( These Bollywood Actors Gets Success In 2022)

यंदाचं २०२२ हे साल बॉलिवूडसाठी फारसं खास ठरलं नाही. या वर्षात अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले. मात्र, या सगळ्यातही काही चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या काळात काही बॉलिवूड चित्रपटांनी ओटीटीची वाट धरली होती. यातूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. यंदाच्या वर्षात काही कलाकार त्यांच्या अभिनयामुळे विशेष लक्षात राहिले. शिवाय वर्षभर त्यांच्या नावाची चर्चा राहिली. पाहुया या यादीत कोण कोण सामील आहेत…

कार्तिक आर्यन : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसाठी २०२२ हे वर्ष खूप खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये चांगलाच कल्ला केला. तर, नुकताच त्याचा ‘फ्रेडी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. कार्तिकने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

शेफाली शहा : अभिनेत्री शेफाली शहा हिने देखील यंदाचं वर्ष खूप गाजवलं. यावर्षी शेफालीने एक अभिनेत्री म्हणून अनेक हटके भूमिका स्वीकारल्या. तिने साकारलेल्या सगळ्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. ‘डार्लिंग्स’, ‘डॉक्टर जी’, ‘दिल्ली क्राईम २’, ‘जलसा’, ‘ह्यूमन’ सारख्या चित्रपटांमध्ये तिने चांगला अभिनय केला.

आलिया भट्ट : दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये स्वतःची जादू दाखवली. या वर्षाची सुरुवातच आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सुपरहिट चित्रपटाने झाली. या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. याशिवाय ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून देखील आलिया भट्टने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

अल्लू अर्जुन : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाने यशाचा झेंडा रोवला. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अल्लू अर्जुनला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली.

रिषभ शेट्टी : वर्षाच्या शेवटला लेखक – दिग्दर्शक – अभिनेता रिषभ शेट्टी याने देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली. त्याचा ‘कांतारा’ हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात ऋषभ शेट्टीने कमाल केली.