हे आहेत बॉलिवूड कलाकारांचे आवडीचे पदार्थ, ते पु...

हे आहेत बॉलिवूड कलाकारांचे आवडीचे पदार्थ, ते पुढ्यात येताच डाएट विसरतात (These Bollywood Actors Are Foodie : They Skip Diet On Seeing Their Favorite Dishes)

बॉलिवूडच्या कलाकारांचे पदार्थ आहेत अत्यंत आवडीचे. ते समोर येताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्यांना आपल्या डायटिंगचा विसर पडतो.

करीना कपूर

 बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच निवडक आहे, तरीही तिचे चाहते हे जाणून घेण्यास उत्सुक असतात की अभिनेत्रीचा आवडता पदार्थ कोणता? याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. बेबो इटालियन फूडची चाहती आहे आणि तिला पिझ्झा, पास्ता खूप आवडतो, याशिवाय करीना बिर्याणीही खूप आवडीने खाते.

 अक्षय कुमार

खिलाडी अक्षय कुमार खूप शिस्तबद्ध आयुष्य जगतो. तो किती मोठा फिटनेस फ्रीक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण खाण्याच्या बाबतीत अक्षय थाई फूड लव्हर आहे, त्याला ग्रीन चिकन करी, चायनीज फूड आणि तंदुरी आवडते. याशिवाय त्याला घरी बनवलेले पंजाबी पदार्थही आवडतात.

अमिताभ बच्चन

बिग बी हे देखील अतिशय शिस्तबद्ध जीवन जगतात. ते स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहाराचीही विशेष काळजी घेतात.  बिग बींना भेंडीची भाजी खायला खूप आवडते त्यामुळे अनेकदा ते शूटला डब्ब्यात भेंडीची भाजीच आणतात. याशिवाय त्यांना मूग डाळही खूप आवडते.

अनुष्का शर्मा

 अनुष्का शर्मा आपल्या फिटनेसच्या बाबतीत कधीही तडजोड करत नाही, परंतु जेव्हा तिच्यासमोर तिचे आवडते पदार्थ येते तेव्हा ती बटर चिकन मोठ्या आवडीने खाते. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड स्टार अभिनेत्री अनुष्का शर्माला बटर चिकन आवडते.

शाहरुख खान

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान देखील खाण्याच्या बाबतीत शौकिन आहे. शाहरुख जेव्हा आपल्यासमोर ग्रील्ड आणि तंदुरी चिकन पाहतो तेव्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटते.  हे आवडते पदार्थ समोर पाहून तो सर्व काही विसरतो. आणि डाएटिंग सोडून त्याच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतो.

 आमिर खान

 ग्लॅमर इंडस्ट्रीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आपले प्रत्येक काम अतिशय चोखपणे करतो, पण जेव्हा खाण्याचा प्रश्न येतो तेव्हा समोर मोगलाई पदार्थ पाहून आमिरला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही.  त्याला मोगलाई पदार्थ खूप आवडतात.

सलमान खान

 बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच सलमान खान आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असला तरी तो खाण्यापिण्याचाही तितकाच शौकीन आहे.  सल्लू मियाँला त्याच्या आईच्या हातची बिर्याणी खायला खूप आवडते. त्याने अनेक वेळा जाहीरपणे त्याला बिर्याणी किती आवडते ते सांगितले आहे.