बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आहे विविध भाषांचे ज...

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आहे विविध भाषांचे ज्ञान… (These Bollywood Actors Actress Know And Speak Two Three Languages)

बॉलिवूडचे कलाकार केवळ हिंदीतच नव्हे तर इतर भाषेतदेखील काम करतात.

‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण, मूळची दक्षिणेतली आहे. दीपिकाला हिंदी, इंग्रजी, तुळू, कोंकणी उत्तम बोलता येते तसेच तिला बंगाली भाषादेखील समजते.

बॉलिवूडमधील आजची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू, हिने करियरच्या सुरवातीला अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तिला हिंदी, पंजाबी, तमिल, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषा येते.

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले आहे. अमिताभ बच्चन यांना हिंदी, उर्दू व्यतिरिक्त पंजाबी, मराठी भाषेत बोलता येते.

अभिनेत्री विद्या बालन मूळची केरळची असून तिला मल्याळम, हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली भाषा बोलता येते.

बॉलिवूडची देखणी अभिनेत्री ऐश्वर्या रायने केवळ हिंदीतच नव्हे तर दाक्षिणात्य, बंगाली चित्रपटात काम केले आहे. ऐश्वर्या रायची मातृभाषा ही तुळू आहे मात्र तिला हिंदी, बंगाली, इंग्रजी, तेलुगू, मराठी, कन्नड या भाषा समजतात तसेच तिला या बोलतादेखील येते.

गजनी गर्ल अर्थात अभिनेत्री असीन, सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत नसली तरी तिला हिंदी, तामिळ, तुळू, इंग्रजी तसेच परकीय भाषा फ्रेंचसुद्धा येते.