टेलिव्हिजनवरील भांडकुदळ अभिनेत्री (These Are Th...

टेलिव्हिजनवरील भांडकुदळ अभिनेत्री (These Are The Most Quarrelsome Actresses Of T.V.)

कलाकारांचा पडद्यावरील वावर, वर्तणूक आणि प्रत्यक्ष जीवनातील वर्तन यामध्ये नेहमीच फरक आढळून येतो. टेलिव्हिजन वरील मालिकांमध्ये साधी, सोज्वळ दिसणारी अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनामध्ये उग्र, आक्रमक असू शकते. तर छोट्या पडद्यावर खलनायकी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात सहृदयी, मवाळ असू शकतात. आजचा आपला विषय अशा काही भांडकुदळ अभिनेत्रींचा आहे, ज्या मालिकांमध्ये संस्कारी, सोज्वळ पात्र साकारतात. पण खासगी जीवनात जाम भांडखोर आहेत. त्यांच्या या उग्र रूपाने त्यांच्याबरोबर लोक काम करू इच्छित नसतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अस्मिता सूद – या तरुण कलावतीने १० वर्षांपूर्वी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘फिर भी न माने बदतमीज दिल’ या मालिकेत तिला चांगली भूमिका मिळाली होती. पण ही बया प्रत्यक्षात त्या मालिकेशी निगडीत कर्मचारी वर्गाशी फारच वाईट प्रकारे वागायची. अस्मिता पुढे चित्रसृष्टीत देखील आली. पण कामापेक्षा वाईट वर्तनामुळे ती लक्षात राहिली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शायनी दोशी – मालिकेत सीधीसाधी लडकी म्हणून काम करणारी शायनी वास्तव जीवनात चांगलीच भांडखोर आहे. ती रोज कुणाशी तरी भांडतेच. ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेत तिची सहकलाकार असलेल्या जेनिफर विंगेट या अभिनेत्रीशी तिचे भांडण इतके विकोपाला गेले की, त्यांच्या चर्चा बाहेर रंगल्या. तिच्या या भांडखोर स्वभावामुळे तिच्या बरोबर काम करायला कोणी तयार होत नव्हते. ‘पांड्या स्टोर’ या मालिकेत सध्या तिच्या कामाची प्रशंसा होत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पा आनंद – ‘दिल मिल गए’ या मालिकेतील भूमिकेने शिल्पा आनंदला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. पण ही सुंदर अभिनेत्री आपल्या दुर्वर्तनाबाबत चांगलीच कुप्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, लहानसहान कारणांवरून राईचा पर्वत करण्याची तिची वाईट खोड आहे. त्यामुळे तिला काम मिळणे बंद झाले. आता तर ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

निया शर्मा – आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर निया शर्माने बऱ्याच टी.व्ही. मालिकेतून नाव कमावले आहे. आपल्या बोल्ड आणि गरमागरम फोटोंमुळे ती सोशल मिडियावर प्रसिद्ध आहे. पण आपल्या कडकलक्ष्मी अवतारामुळे खासगीत ती कुप्रसिद्ध झाली आहे. ‘जमाई राजा’ मालिकेने तिला खूप नाव मिळाले. पण तिच्यासोबत काम करणाऱ्या रवि दुबे या अभिनेत्यासोबत तिने खूप भांडणे केलीत. आता मात्र त्यांची दोस्ती जमली आहे, असं म्हणतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हिना खान- अनेक सिरीयल्समधून साध्या, सोज्वळ सुनेची भूमिका गाजवणारी हिना खान, खासगीत अतिशय भांडखोर आहे. ‘बिग बॉस’ मधून तिनं आपल्या उग्र स्वभावाचे प्रदर्शन केले होतेच. त्यामध्ये ती नित्यनेमाने तंटे निर्माण करत होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

उर्फी जावेद – ‘डायन’ या सिरीयल मधून नावारुपास आलेली उर्फी त्यामानाने कमी ठिकाणी दिसते. पण चित्रविचित्र ड्रेसेस घालून, त्याचे रस्त्यावर प्रदर्शन करत, ती कायमच चर्चेत असते. त्याचप्रमाणे आपल्या गैरवर्तनाबाबत देखील ती चर्चेत आहे. असं म्हणतात की, या भांडखोर स्वभावाला वैतागून तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेला. बहुधा या स्वभावामुळेच तिला जास्त कामे मिळत नसावीत.