लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अभि...

लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अभिनेत्री (These Actresses Were In Live-In Relationship Before Marriage)

बॉलीवूडमधील नातेसंबंध जुळायला अन्‌ बिघडायला देखील वेळ लागत नाही. हां काही जोडपी आहेत जी वर्षानुवर्षे नातेसंबंध टिकवून आहेत. तर अनेक अभिनेत्री अशाही आहेत की ज्या आपल्या लव्ह पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्या पण प्रेमात झालेल्या फसवणुकीमुळे त्यांना नंतर विभक्त व्हावं लागलं. चला जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल, ज्या लग्नाआधी दुसऱ्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होत्या.

करीना कपूर-शाहिद कपूर

करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. दोघेही पाच वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचं नातं परीकथेसारखं होतं. ‘जब वी मेट’च्या शूटिंगदरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं असलं तरी त्याआधी दोघंही बराच काळ लिव्ह-इनमध्ये होते.

दीपिका पादुकोण-रणबीर कपूर

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरची एकेकाळी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा होती. दीपिका रणबीरच्या एवढ्या प्रेमात पडली होती की तिने त्याच्या नावाचा टॅटूही काढून घेतला होता. दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. दरम्यान, रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफचा प्रवेश झाला आणि दीपिकासोबतची प्रेमकहाणी तिथेच संपली. या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी दीपिका पादुकोणला बराच वेळ लागला.

प्रियंका चोप्रा-शाहिद कपूर

करीना कपूरशिवाय शाहिद कपूरची अनेक प्रेमप्रकरणं झाली. शाहिदचं प्रियंका चोप्रासोबतचं प्रेमप्रकरण बरंच गाजलं. मात्र दोघांनीही कधीही उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते आणि जेव्हा इन्कम टॅक्स टीम प्रियांकाच्या घरी गेली आणि शाहिदने दरवाजा उघडला तेव्हा हा प्रकार उघड झाला. पुढे त्यांचा ब्रेकअपही झाला. आज दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.

नेहा कक्कर-हिमांश कोहली

आज रोहनप्रीतची वधू म्हणून नेहा कक्कर खूप आनंदी आहे. पण रोहनप्रीतच्या आधी नेहा कक्कर हिमांश कोहलीच्या प्रेमात पडली होती. दोघांचे नाते बरेच वादात सापडले होते. लग्नापूर्वी नेहा हिमांशसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली होती, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यांची लव्हस्टोरीही संपुष्टात आली.

ऐश्वर्या राय बच्चन-सलमान खान

सलमान खान आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी ही बॉलिवूडच्या प्रेमकथांमधली कधीही न विसरता येणारी गोष्ट आहे. मात्र, सलमानच्या या पझेसिव्हनेसमुळे दोघांचे नाते बरेच वादग्रस्त ठरले होते आणि त्यांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये खूप चर्चा झाल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा दोघे प्रेमाच होते, तेव्हा ते लिव्ह-इनमध्येही होते, परंतु त्यांची प्रेमकहाणी बऱ्याच विवादांसह संपली. बरं आता ॲश बच्चन कुटुंबाची सुसंस्कृत सून झाली आहे, तर सलमान अजूनही बॅचलर आहे.

बिपाशा बासू – जॉन अब्राहम

बिपाशा आणि जॉन जवळपास ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले. दोघांच्या अफेअरचे किस्सेही बरेच दिवस चर्चेत राहिले. दोघेही लिव्हइनमध्ये राहत होते. बिपाशाला जॉनशी लग्न करायचं होतं, पण लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांचेच हृदय तुटले. आता दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.