या अभिनेत्रींकडे सिनेमाची संधी आयतीच चालून आली ...

या अभिनेत्रींकडे सिनेमाची संधी आयतीच चालून आली : कंगना रणावत ते रविना टंडन त्यात सामील आहेत. (These Actresses Suddenly Got Offers Of Films : Name Like Kangana And Raveena Are Include)

बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नवोदितांना कितीतरी संघर्ष करावा लागतो. ही संख्या मोठी आहे. पण काही भाग्यवान अभिनेत्रींकडे ही संधी आयतीच चालून आली. तिचं सोनं करून त्या यशोशिखरावर पोहचल्या. या नशीबवान मुलींच्या यादीत कंगना रणावत  आणि रविना टंडन सामील आहेत.

कंगना रणावत :

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सध्या विवादास्पद व्यक्तिमत्व म्हणून गाजत असलेली कंगना रणावत, एकदा ज्या हॉटेलात बसली होती, तिथेच दिग्दर्शक अनुराग कश्यप गेले. तेव्हा अनुराग ‘गँगस्टर’ हा चित्रपट बनवत होते. त्यामध्ये त्यांना नवा चेहरा हवा होता. कंगना त्या भूमिकेत फिट आहे, असं वाटून त्यांनी तिला ही भूमिका दिली. अशा रीतीने कंगनाचा बॉलिवूडमध्ये सहजच प्रवेश झाला.
रविना टंडन :

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रविना ही प्रल्हाद कक्कड सोबत इंटर्नशिप करत होती. तेव्हा तिची सलमान खानशी भेट झाली. ‘पत्थर के फूल’ या जी.पी. सिप्पी निर्मित चित्रपटात नवा चेहरा हवा होता. सलमानने राविनाचे नाव सुचविले अन या चित्रपटाची ऑफर तिच्याकडे अशी चालून आली.


झरीन खान :

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘युवराज’ या चित्रपटाचे चित्रण चालू असताना झरीन खान सिनेमाची फॅन म्हणून तिथे शूटिंग पाहायला पोहचली होती. सलमान खानची तिच्यावर नजर पडली अन त्याने तिला सिनेमात येण्याची संधी मिळवून दिली.
परवीन बाबी :

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
एकेकाळी खूप गाजलेले दिग्दर्शक होते बी. आर. इशारा. त्यांना आपल्या ‘चरित्र’ या चित्रपटासाठी नवा चेहरा हवा होता. एके दिवशी त्यांना रस्त्यावर उभी राहून सिगरेट ओढत असलेली युवती दिसली. ती परवीन बाबी होती. आपल्या नायिकेच्या भूमिकेसाठी ही योग्य आहे, हे ध्यानात येताच, त्यांनी परवीनला संधी दिली.


रीना रॉय :

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
एका मुलाखतीत रीना रॉयने माहिती दिली की, खेळताना तिला खांबावर चढलेली काही सिनेसृष्टीशी संबंधित लोकांनी पहिली. अन पत्ता शोधत तिच्या घरी पोहचले. अशा रीतीने रीनाला देखील सिनेमात सहज प्रवेश मिळाला.