लहान वयातच आई आणि सासूच्या भूमिका साकार करणाऱ्य...

लहान वयातच आई आणि सासूच्या भूमिका साकार करणाऱ्या टी.व्ही. अभिनेत्री (These Actresses Played The Role Of Mother And Mother-In-LOw On T.V. At A Young Age)

टी.व्ही. मालिकांची लोकप्रियता किती आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. काही मालिका संपल्या तरी त्यामधून आदर्श ‘बहू’च्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींना लोक विसरले नाहीत. आपल्या कसदार अभिनयाने या तरुण कलावतींनी ‘संस्कारी बहू’ अशी प्रतिमा उभारली. यापैकी काही अभिनेत्रींनी तर लहान वयातच आई आणि सासू अशा पोक्त भूमिका केल्या आहेत.

अंकिता लोखंडे

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अर्चनाची भूमिका केलेली अंकिता लोखंडे घराघरात पोहचली. यामध्ये संस्कारी सुनेची भूमिका करतानाच तिने, आपल्या प्रत्यक्षातील वयापेक्षा ५ वर्षांनी लहान असलेल्या आशा नेगीच्या आईची भूमिका निभावली.

हिना खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची भूमिका करून हिना खान नावारुपास आली. तिला घराघरात नाव मिळाले. एक आदर्श मुलगी आणि सून ही भूमिका करतानाच, फक्त २९ व्या वर्षी हिना सासूदेखील बनली.

दिव्यांका त्रिपाठी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘ये है मोहब्बते’ या लोकप्रिय मालिकेत इशिताची भूमिका करून नाव कमावलेली दिव्यांका त्रिपाठी मोठ्या मुलांची आई झाली आहे. फक्त ३०व्या वर्षी दिव्यांकाने मोठ्या मुलांची जबाबदार आई, ही भूमिका पडद्यावर सादर करून दर्शकांची मने जिंकली.

देवोलिना भट्टाचार्जी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अतिशय कमी वयात आई आणि सासू या वयस्कर व्यक्तीरेखा देवोलिनाने पडद्यावर साकार केल्या आहेत. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत आपल्या वयाच्या २५व्या वर्षी तिने सासूची भूमिका केली.

दीपिका कक्कड

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमर ही शीर्षक भूमिका सादर करणाऱ्या दीपिका कक्कडने छोट्या पडद्यावर सून आणि आई अशा वयस्कर व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. तिच्या वयाच्या २९ व्या वर्षी दीपिकाने या मालिकेत २ मुलांची आई, अशी भूमिका यशस्वीपणे सादर केली.