लग्नानंतर पुन्हा पडद्यावर आलेल्या या अभिनेत्री ...

लग्नानंतर पुन्हा पडद्यावर आलेल्या या अभिनेत्री रसिकांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. (These Actresses Made A Comeback On Screen, But Failed To Win The Hearts Of Audience)

लग्न झाल्यावर तीन वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अनुष्का शर्मा पुन्हा त्यावर येत आहे. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून तिचे पुनरागमन होणार आहे. लग्न आणि मुले झाल्यानंतर पुन्हा चित्रपटातून चमकू पाहणारी अनुष्का ही काही पहिलीच अभिनेत्री नाही. हा प्रयोग आधी काही अभिनेत्रींनी केला. पण त्यांचा प्रयोग फसला. प्रेक्षकांनी त्यांना पूर्वीसारखे स्वीकारले नाही.

ऐश्वर्या राय

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सौंदर्यवती ऐश्वर्या रायने एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटांमधून भूमिका केल्या. २००७ साली तिने अभिषेक बच्चनशी लग्न केले. अन आराध्या या मुलीच्या गर्भारपणी व जन्मानंतर थोडया काळासाठी तिने कामे सोडली. नंतर ‘जजबा’ या चित्रपटातून तिने पुनरागमन केले खरे: पण ती रसिकांची मने जिंकू शकली नाही.

माधुरी दिक्षीत

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
धक-धक  गर्ल म्हणून खळाळते हास्य करणारी सौंदर्यसंपन्न माधुरी आता टेलिव्हिजन वरील रिऍलिटी शो मधून परीक्षकाची भूमिका निभावते आहे. १९९९ साली डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर तिने सिनेसृष्टीशी फारकत घेतली. ‘आजा नच ले’ या चित्रपटातून ती २००७ साली पुन्हा रुपेरी पडद्यावर अवतरली. परंतु तिकीट बारीवर या चित्रपटाचे थंड स्वागत झाले.

करीश्मा कपूर

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
करिश्माने आपल्या कारकिर्दीच्या काळात उत्तमोत्तम चित्रपटातून चांगल्या भूमिका केल्या. २००३ साली तिने बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं. अन २ मुलांना जन्म दिला. या काळातील ५ वर्षे तिने सिनेमाशी फारकत घेतली होती. मग २०१२ साली तिने ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटातून पुनरागमन केले. पण हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

काजोल

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
करिअरच्या शिखरावर असताना काजोलने, १९९९ साली अजय देवगणशी लग्न केले. लग्नानंतर ती सिनेमात कामे करत राहिली. २००६ साली काजोलने ‘फना’ या चित्रपटाने पुन्हा पडदा गाठला. हा चित्रपट चांगलाच चालला. पण त्यानंतर तिने काम केलेले चित्रपट फारसे चालले नाहीत.

राणी मुखर्जी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
करिअर उत्तम चालले असताना राणी मुखर्जीने २०१४ साली आदित्य चोप्राशी लग्न केले. अन तिला मुलगी झाली. तेव्हा ती ३ वर्षे सिनेमापासून दूर राहिली होती. ‘हीचकी’ या चित्रपटातून ती सिनेमात परतली. पण चित्रपट फ्लॉप झाला.

शिल्पा शेट्टी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
फिटनेस बाबत अतिशय जागरूक असलेल्या शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी लग्न करून सिनेसृष्टीपासून फारकत घेतली. खूप काळानंतर ती ‘हंगामा २’ या चित्रपटातून पुन्हा आली. पण हा चित्रपट लोकांच्या पसंतीस काही उतरला नाही.