सलमान खान सोबत काम न करण्याची हिंमत दाखवणाऱ्या ...

सलमान खान सोबत काम न करण्याची हिंमत दाखवणाऱ्या अभिनेत्री : एकीने तर करार केला, तरीपण चित्रपट सोडला (These Actresses Have Refused To Work With Salman Khan : One Left Even After Signing The Film)

आज सलमान खान यशोशिखरावर आहे. त्याच्या चित्रपटात कथा असो व नसो; केवळ त्याच्या नावावर चित्रपट चालतो. अन  हिट होतो. या भाईजानच्या नावावर चित्रपट खूप गल्ला भरतो. त्यामुळे त्याच्या बरोबर काम करायला नव्या जुन्या अभिनेत्री एका पायावर तयार असतात. पण इथे अशा काही खमक्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी सलमान बरोबर काम  करण्यास नकार दिला आहे.


जुही चावला : जेव्हा सलमान खान चित्रपटात येण्यासाठी स्ट्रगल करत होता, तेव्हा जुही चावला प्रस्थापित अभिनेत्री झाली होती. तिच्या एका चित्रपटात सलमानने कॅमिओ पण केला होता. पण जेव्हा निर्माते व दिग्दर्शक त्यांची जोडी बनवायला गेले, तेव्हा जुहीने साफ नकार दिला होता. एका स्ट्रगलर सोबत मी काम करणार नाही, असं सांगून जुहीने सलमानला नकार दिला होता.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सोनाली बेन्द्रे : ‘हम साथ साथ है’ या हिट चित्रपटात सलमान आणि सोनाली बेन्द्रे यांची जोडी चमकली होती. पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमान कज्जेखटल्यात अडकला त्यामुळे त्यानंतर सोनालीने त्याच्याबरोबर काम करण्यास नकार दिला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम


अमिषा पटेल : ‘जलवा’ या चित्रपटात सलमान व अमिषा एकत्र आले होते. पण हा चित्रपट पडला. त्यामुळे लोकांनी तिला दुसऱ्या एका चित्रपटात सलमान बरोबर काम करण्याची ऑफर दिली. तेव्हा आमिषाने हिंमत दाखवून तो चित्रपट नाकारला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

कंगना रणावत : बॉलिवूडची धडाकेबाज अभिनेत्री म्हणून कंगनाचा बोलबाला आहे. तिने कोणत्याही सुपरस्टार सोबत अद्याप काम केलेले नाही. तरीपण ‘सुलतान’ या चित्रपटात सलमानची नायिका म्हणून काम करण्याची तिला ऑफर देण्यात आली असता, तिने सपशेल नकार दिला होता, नंतर ती भूमिका अनुष्का शर्माने केली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दीपिका पदुकोण : आज दीपिका बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या दीपिकाने एकच नाही, तर सलमान सोबत काम करण्यासाठी आलेल्या तब्बल ६ चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. दीपिकाने असं कां केलं, त्याचं कारण कळलं नाही. पण तिच्या या नाकारघंटाबाबत सलमानने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
प्रियांका चोप्रा : बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास केलेली प्रियांका चोप्रा सलमानला नकार देऊन चुकली आहे. ‘भारत’ या चित्रपटासाठी तिनं काम करण्यासाठी करार देखील केला होता. पण नंतर काय घडलं कुणास ठाऊक, पण प्रियंकाने तो चित्रपट नाकारला. तिच्या या नाकारामुळे निर्माता व सलमानला धक्का बसला होता. कारण या दोघांनी आधी काही चित्रपट एकत्र केले होते. नंतर ‘भारत’ मधील भूमिकेसाठी कतरीना कैफला घेण्यात आलं.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम