अक्षय कुमारसोबत काम करण्यास या अभिनेत्रींनी दिल...

अक्षय कुमारसोबत काम करण्यास या अभिनेत्रींनी दिला होता नकार (These Actresses have Refused to Work with Akshay Kumar, Name of His Two Girlfriends Also Included In The List)

 बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत काम करणे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. इंडस्ट्रीतील जवळपास बऱ्याच लहान-मोठ्या अभिनेत्रींनी अक्षयसोबत काम केले आहे, पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी अक्षय कुमारसोबत काम करण्यास नकार दिला होता.  खिलाडी कुमारसोबत चित्रपटात काम करण्याची ऑफर आली तेव्हा त्या अभिनेत्रींनी ती नकारली.

बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री शिल्पा शेट्टी एकेकाळी अक्षय कुमारची गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जायची.  एकेकाळी या दोघांची प्रेमकहाणी खूप गाजली होती. शिल्पा आणि अक्षयने ‘मैं खिलाडी तू अनारी’ आणि ‘धडकन’ सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ट्विंकल खन्नामुळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.

रवीना टंडन

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने अक्षय कुमारसोबत ‘मोहरा’ आणि ‘खिलाडियों के खिलाडी’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. दोघांनीही एकमेकांना बराच काळ डेट केले होते. त्यांनी गपचूप साखरपूडा देखील केल्याचे म्हटले जाते.  पण नंतर काही कारणास्तव दोघांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर रवीना आणि अक्षय कुमारने पुन्हा एकत्र काम केले नाही.

रानी मुखर्जी

अक्षय कुमारसोबत काम करण्यास नकार देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राणी मुखर्जीच्या नावाचाही समावेश आहे. राणी आणि अक्षयने कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.  मिळालेल्या माहितीनुसार रानी मुखर्जीला ‘संघर्ष’ आणि ‘आवारा पागल दीवाना’ सारख्या चित्रपटांची ऑफर आली होती, मात्र तिने अक्षयसोबत काम करण्यास नकार दिला होता.

दिशा पाटणी

अक्षय कुमारसोबत काम न करु इच्छिणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिशा पाटणीचे नावही सहभागी आहे. दिशाला अक्षयसोबत चित्रपट करण्याची एक ऑफऱ आली होती. पण कोणत्याहीतरी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे कारण देत दिशाने ती ऑफर नाकारली.

कंगणा रणावत

बॉलिवूडची सदा चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगणा रणावतनेही अक्षयसोबत काम करण्यास नकार दिला आहे. कंगणाला अक्षयसोबत काम करण्यासाठी रुस्तम आणि एअरलिफ्ट या चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण तिने त्या दोन्ही ऑफर नाकारल्या. कंगणाच्या मते दोन्ही चित्रपटात अक्षयचे पात्र तिच्यापेक्षा जास्त सक्षम होते.

अक्षयचा रामसेतू चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. अक्षयसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अक्षय लवकरच ओएमजी 2, सेल्फी, आणि ड्रायव्हिंग लायसन्स या चित्रपटात दिसणार आहे.