या अभिनेत्रींच्या गरोदरपणात आली खूप अडचणी, काही...

या अभिनेत्रींच्या गरोदरपणात आली खूप अडचणी, काहींना अजूनही आहे आई बनण्याची आस (These Actresses Have Faced a Lot of Problems in Pregnancy, Some Still Waiting to Become Mother)

टीव्ही अभिनेत्री आपल्या अभिनय आणि मालिकांमधील पात्रांसाठी घरोघरी ओळखल्या जातात. त्यातील अनेक अभिनेत्री या विवाहीत असून काही जणी आईसुद्धा आहेत. गरोदरपण म्हटले की खूप अडीअडचणींना सामोरे जावे लागते. त्यात जर रोज धावपळीचे धकाधकीचे जीवन असेल तर अजूनच काळजी करावी लागते. गरोदरपणातील सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर, अनेक अभिनेत्री यशस्वीरित्या आई झाल्या, तर काहींना अजूनही आई होण्याची आस लागली आहे. अशाच अभिनेत्रींवर एक नजर टाकूया…

देबिना बॅनर्जी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जीने लग्नानंतर अनेक वर्षे आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे ती नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकली नाही, त्यामुळे तिने IVF चा आधार घेतला आणि तिने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. पहिली मुलगी लियानाच्या जन्मानंतर लगेचच ती नैसर्गिकरित्या गरोदर राहिली आणि काही महिन्यांनंतर दुसरी मुलगी दिविशा जन्माला आली.

रुपाली गांगुली

टीव्ही सीरियल ‘अनुपमा’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली हिलाही आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे म्हटले जाते की थायरॉईडमुळे तिला गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, मात्र, अभिनेत्रीने हार मानली नाही आणि अनेक अडचणींनंतर अखेर 2013 मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

संभावना सेठ

आयटम गर्ल आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठने 2016 मध्ये अविनाश द्विवेदीसोबत लग्न केले. मात्र, लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही या अभिनेत्रीची ओटी रितच होती. आई होऊ न शकल्याने तिला ट्रोल देखील करण्यात आले होते, त्यानंतर तिने ट्रोलर्सना उत्तर देताना आपल्या प्रेग्नेंसीच्या समस्येबद्दल खुलेपणाने सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की ती सुमारे 5-6 वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहे आणि IVF तंत्रज्ञानाची मदत घेत आहे.

माही विज

टीव्ही अभिनेत्री माही विजलाही आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ न शकल्यामुळे तिने IVF ची मदत देखील घेतली, परंतु अनेक वेळा ती प्रक्रिया अयशस्वी झाली. अभिनेत्रीने एकदा खुलासा केला की या प्रक्रियेत तिला सुमारे 100 इंजेक्शन्स घ्यावी लागली, परंतु नंतर IVF च्या मदतीने तिने एका मुलीला जन्म दिला. याशिवाय या जोडप्याने दोन मुले दत्तक घेतली आहेत, ज्यांचे संगोपन ते करत आहेत.

एकता कपूर

टीव्हीची क्वीन एकता कपूरचे लग्न झाले नसले तरी तिला नेहमीच आई व्हायचे होते. लग्नाशिवाय, तिला IVF द्वारे मुलाला जन्म द्यायचा होता. अनेक वर्षे IUI आणि IVF चा प्रयत्न केला. त्यात यश न मिळाल्याने तिने सरोगसीचा आधार घेतला आणि एका मुलाची आई झाली. त्यांच्या मुलाचे नाव रवी आहे.

पायल रोहतगी

पायल रोहतगीने २०२२ साली कुस्तीपटू संग्राम सिंहसोबत लग्न केले, ती त्याच्यासोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती आणि आई बनण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या प्रेग्नेंसीच्या समस्येबद्दलही ती उघडपणे बोलली. ‘लॉकअप’ या शोमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी तिने आयव्हीएफची मदत घेतली, पण आजपर्यंत तिला यश मिळाले नाही.

कश्मीरा शाह

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री कश्मिरा शाहने कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीने बर्याच वर्षांपासून बाळासाठी आणि आई होण्यासाठी अनेक पर्यायांचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. अखेरीस, अभिनेत्रीने सरोगसीची मदत घेतली आणि याद्वारे ती दोन मुलांची आई झाली.