चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होत्या या अभिन...

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होत्या या अभिनेत्री(These Actresses Got Pregnant During Shooting, Some Left Film Midway and Some Worked in Pregnancy)

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्री वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यातील काही अभिनेत्री लग्नानंतर मुलांच्या आई झाल्या आहेत, त्यापैकी काही आपल्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहेत, तर अनेक अजूनही इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. शूटिंगदरम्यान अनेक अभिनेत्री गरोदर राहिल्या असल्या, तरी काहींनी गरोदर असतानाही आपले शूटिंग सुरू ठेवले, तर काही गर्भवती होताच चित्रपटापासून दूर झाल्या.

करीना कपूर

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई आहे,  करीना दोन्ही गरोदरपणाच्या वेळी शूटिंगमध्ये व्यस्त होती. पहिल्यांदा ती ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटिंगदरम्यान तर दुसऱ्यांदा ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगदरम्यान गरोदर होती. गरोदरपणातही तिने आपल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.

ऐश्वर्या राय बच्चन

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन बद्दल असे म्हटले जाते की ती ‘हिरोईन’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी प्रेग्नंट झाली होती. प्रेग्नेंसीची बातमी कळल्यानंतर निर्मात्यांना या चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले आणि त्यानंतर ऐश्वर्याने गरोदरपणामुळे चित्रपट मध्येच सोडला.

काजोल

या यादीतील पुढचे नाव काजोलचे आहे. ती ‘वुई आर फॅमिली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गर्भवती झाली होती. मात्र, गरोदर असूनही काजोलने काम सुरूच ठेवले. अभिनेत्रीने गरोदर असतानाच या चित्रपटाचे शूटिंग केले आणि त्याच्या प्रमोशनमध्येही ती सहभागी झाली होती. असे म्हटले जाते की, अजय देवगणची काजोलने विश्रांती घ्यावी अशी इच्छा होती, पण तिने काम सुरूच ठेवले.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होती. गरोदरपणाची बातमी समोर आल्यानंतरही माधुरीने चित्रपटाचे शूटिंग सुरूच ठेवले. त्यावेळी तिने ‘हंपे ये किसने हारा रंग डाला’ गाण्याचे शूटिंग पूर्ण केले. गर्भवती असूनही तिने आपले काम वेळेवर पूर्ण केले होते.

जुही चावला

90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री जुही चावला शूटिंग दरम्यान गर्भवती झाली होती. जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा तिने अमेरिकेत एक स्टेज शो केला होता. दुस-यांदा ती ‘झंकार बीट्स’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना गरोदर होती. त्यावेळीही तिने गरोदरपणात आपले शूटिंग पूर्ण केले.

जया बच्चन

मेगास्टार अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होत्या. मात्र, गरोदर असूनही त्यांनी कामातून ब्रेक घेण्याऐवजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. चित्रपटातील एका दृश्यात त्यांचा बेबी बंपही दिसला होता.