या अभिनेत्रींनी इतकी अफाट संपत्ती मिळवली आहे की...

या अभिनेत्रींनी इतकी अफाट संपत्ती मिळवली आहे की, आकडे ऐकून डोके चक्रावते (These Actresses Got Fame on Their Own Hard Work, You Will Be Surprised to Know Their Total Assets)

झगमगत्या चित्रसृष्टीमध्ये अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींना त्यांच्या कामाचा मोबदला कमी प्रमाणात मिळतो असं आपण बरेचदा ऐकत असतो. पण याला काही अभिनेत्री अपवाद आहेत. किंबहुना अतिशय मेहनत करून आपल्या सहकलाकारास तोडीस तोड ठरलेल्या काही अभिनेत्री आहेत आणि त्यांच्या मानधनाचा आकडाही भलामोठा आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर जाहिराती, मॉडेलिंग अशा इतरही माध्यमातून यांनी कमाई केलेली आहे. पाहूया या अभिनेत्री कोण आहेत की ज्यांच्या अफाट संपत्तीचा आकडा ऐकल्यानंतर डोके चक्रावते.

ऐश्वर्या राय बच्चन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बच्चन परिवाराच्या सूनेच्या नावातच ऐश्वर्य आहे. ऐश्वर्या राय बच्चन मागील दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये सक्रीय आहे. मिळालेल्या माहितीनुसार ॲशची एकूण संपत्ती १०० मिलियन डॉलर इतकी आहे. चित्रपटांतून करोडो रुपयांची कमाई करणारी ॲश मागील अनेक वर्षांपासून लॉरिअलची ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

कतरिना कैफ

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ चित्रपटात काम करण्यासाठी करोडोंमध्ये फी आकारते. अर्थातच कतरिनाने अतिशय कष्टाने आणि स्वहिमतीने हा यशस्वी पल्ला गाठलेला आहे. तिच्या उत्पन्नाचा आकडा ३० मिलियन डॉलर इतका आहे. कतरिनाही चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ब्रँडसाठी जाहिराती करते.

प्रियंका चोप्रा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

देसीगर्ल प्रियंका चोप्राने देखील स्वकष्टाने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. या ग्लोबल स्टारची एकूण संपत्ती ७० मिलियन डॉलर इतकी आहे. काही महिन्यांपूर्वी तिने अमेरिकेमध्ये सोना नावाचे इंडियन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

करीना कपूर खान

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सैफ अली खानची बेगम साहिबा करीना कपूर खान सतत चित्रपटांमध्ये व्यस्त असते. गरोदरपणातही करीनाने काम केलं आणि नवीन पायंडा पाडला. करीनाच्या गर्भश्रीमंतीबद्दल बोलायलाच नको. पण तिच्या एकटीच्या उत्पन्नाचं सांगायचं तर ती ६० मिलियन डॉलरची मालकीण आहे. शिवाय ती जवळपास १५ ब्रँड्‌सना प्रमोट करत असल्याची माहिती आहे.

अनुष्का शर्मा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माने इंडस्ट्रीत जे काही स्थान मिळवले आहे, त्याचं सर्व श्रेय केवळ अन्‌ केवळ तिच्या मेहनतीलाच जातं. अनुष्का एका चित्रपटासाठी जवळपास १५ कोटी रुपये घेत असल्याचे समजते. सोबतच ती क्लीन स्लेट फ्लिम्ज्‌ नावाच्या एका प्रोडक्शन कंपनीची मालकीणआहे. तिचं एकटीचं वार्षिक उत्पन्न ४६ मिलियन डॉलर इतकं आहे.