नवऱ्याशी काडीमोड घेतल्यानंतर यश मिळालेल्या अभिन...

नवऱ्याशी काडीमोड घेतल्यानंतर यश मिळालेल्या अभिनेत्री; काहींनी तर हे करिअर करण्यासाठी जोडीदाराला सोडले (These Actresses Got Fame after Getting Divorce From Husband; Some of Them Left Their Partner for Acting)

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळेच नव्हे तर त्यांच्या सुंदरतेमुळे लाखो-करोडो लोकांच्या मनावर राज्य करताहेत. चित्रसृष्टीमधील अशा सुंदर यशस्वी अभिनेत्रींमध्ये काही अभिनेत्रींनी नवऱ्याशी काडीमोड घेतला असून त्यांच्यावर घटस्फोटित असा शिक्का बसला आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात नावलौकिक मिळालेल्या या अभिनेत्री आपल्या वैवाहिक जीवनात मात्र अपयशी ठरल्या आहेत. किंबहुना अशाही काही अभिनेत्री आहेत की ज्यांना आपल्या पतीपासून विलग झाल्यानंतरच यश प्राप्त झाले आहे तर काहींनी अभिनयात काहीतरी करून दाखविण्यासाठी आपल्या जोडीदाराला सोडले आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ज्या अभिनेत्रींना स्वतःचे लग्न पणाला लावावे लागले, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

मल्लिका शेरावत

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

मल्लिका शेरावतच्या सौंदर्याची एक वेगळीच जादू तिच्या चाहत्यांवर आहे. अभिनयासोबतच तिने आपल्या बोल्डनेसने दर्शकांच्या मनात स्वतःचं स्थान बनवलं आहे. तिला हे यश पती करण सिंह गिल याला काडीमोड दिल्यानंतर मिळालेलं आहे. मल्लिकाने घटस्फोटानंतरच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. येथे आल्यानंतर तिने ‘ख्वाहिश’, ‘मर्डर’ यांसारखे चित्रपट करून नावलौकिक मिळवला.  

चित्रांगदा सिंह

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा या हिंदी चित्रसृष्टीमध्ये आली तेव्हा ती विवाहित अन्‌ एका मुलाची आई देखील होती. मात्र अभिनय क्षेत्रात नटी होण्यासाठी आल्यानंतर तिचे तिच्या पतीसोबत ज्योति रंधावासोबत खटके उडू लागले. दोघांमधील नात्यात इतकी कटुता आली होती की दोघांनी २०१४ साली एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

अदिती राव हैदरी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

राजघराण्याशी संबंधित अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने २००९ सालामध्ये वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या ४ वर्षानंतर २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अन्‌ घटस्फोटाच्या दोन वर्षे आधीच २०११ मध्ये तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते.

मलायका अरोरा

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पतीपासून विभक्त झाल्यानंतर मलाइकालाही स्वतंत्र ओळख आणि प्रसिद्धी मिळाली आहे. जवळपास १० वर्षांच्या संसारानंतर तिने अरबाज खानपासून काडीमोड घेतला. त्यानंतर सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती अनेक शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते, ज्यामुळे ती अनेकदा चर्चेतही असते.

कल्की कोचलिन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अभिनेत्री कल्की कोचलिनने २००९ मध्ये ‘देव डी’ चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर दोनच वर्षात ती पतीपासून वेगळी झाली आणि पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने ‘शैतान’ सारखा हिट चित्रपट दिला. आज कल्की हे बॉलीवूडमधील एक सुपरिचित नाव आहे. सध्या ती तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत राहत आहे.

राखी गुलजार

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री राखीने तिच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. राखी १५ वर्षांची असताना तिने बंगाली चित्रपट निर्माता अजय विश्वास यांच्याशी लग्न केले, परंतु तिचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये नायिका बनली आणि तिला यशही मिळाले. फिल्मी दुनियेत प्रसिद्धी आणि यश मिळवल्यानंतर तिने गुलजार यांच्याशी लग्न केले, पण हे नातेही फार काळ टिकले नाही.