लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच आई झाल्या या अभ...

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच आई झाल्या या अभिनत्री (These Actresses Became Mothers After a Few Months of Marriage, Fans Got Surprised)

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित अनेक अभिनेत्री लग्नानंतर आपल्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाल्या आहेत, तर अनेक अभिनेत्री आहेत नुकत्याच आई झाल्या आहेत किंवा बनणार आहेत. अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर अनेक वर्षे आई होण्यासाठी वाट पाहिली, तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर काही महिन्यांतच आई बनून आनंदाची बातमी देऊन आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. नुकतीच आलिया भट्ट आई झाली आहे, पण तिच्याशिवाय अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर आई झाल्या आहेत.

आलिया भट्ट

बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली.

नयनतारा

साऊथ चित्रपटांची लेडी सुपरस्टार नयनताराने यावर्षी जूनमध्ये दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यासंबधीत अनेक बातम्या व्हायरल झाल्या. मात्र सर्वात मोठा धक्का बसला तो नयनतारा आई झाल्याच्या बातमीमुळे. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच नयनतारा जुळ्या मुलांची आई झाल्याची बातमी समोर आली. अभिनेत्री सरोगसीच्या माध्यमातून आई झाली.

दिया मिर्झा

लग्नानंतर काही महिन्यातच गुड न्यूज देणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिया मिर्झाच्या नावाचाही समावेश आहे. दियाने फेब्रुवारी 2021 मध्ये बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले आणि मे महिन्यात ती एका मुलाची आई झाली. लग्नानंतर इतक्या लवकर आई झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नेहा धुपिया

लग्नानंतर काही महिन्यांत आई बनणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नेहा धुपियाचाही समावेश होतो. अभिनेत्रीने मे 2018 मध्ये अंगद बेदीसोबत लग्न केले आणि काही दिवसांत आपल्या गरोदरपणाची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला.

पूजा बॅनर्जी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक, पूजा बॅनर्जीने मार्च 2020 मध्ये अभिनेता कुणाल वर्माशी लग्न केले आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुलाला जन्म दिला. लग्नानंतर काही महिन्यातच आई झाल्याची गोड बातमी सांगून या अभिनेत्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले.