तारक मेहता मालिका सोडल्याचा या कलाकारांना होत आ...

तारक मेहता मालिका सोडल्याचा या कलाकारांना होत आहे पश्चापात (These Actors Regret Leaving ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’, Sudden Drop in Career Graph)

2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सुरु झाली. तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेत अनेक नव्या कलाकारांनी एण्ट्री केली तर काहींनी या मालिकेला रामराम केला. पण मालिका सोडल्यामुळे काही कलाकारांचे करीअर हळूहळू डबघाईला येऊ लागल्यामुळे त्यांना मालिका सोडल्याचा पश्चाताप सहन करावा लागला.

दिशा वकानी

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दयाबेनची भूमिका करून लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेत दिसली नाही, तरीही प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दिशाने 2017 मध्ये प्रसूती रजा घेतली होती, त्यानंतर ती अद्याप मालिकेमध्ये परतली नाही. दिशा आता दुस-यांदा आई झाली असून ती अभिनयापासून जवळपास दूरच गेली आहे.

नेहा मेहता

या मालिकेत अंजली मेहताची भूमिका करणारी अभिनेत्री नेहा मेहता आता या मालिकेचा भाग नाही. प्रॉडक्शन हाऊससोबतच्या मतभेदामुळे अभिनेत्रीने 2020 मध्ये मालिकेला रामराम केला होता. त्यानंतर ती इतर कोणत्याही शोचा भाग होऊ शकली नाही, पण आता ती गुजराती चित्रपटांमध्ये काम करतेय.

शैलेश लोढा

या मालिकेत तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता शैलेश लोढाने काही महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडली. सध्या हा अभिनेता ‘वाह भाई वाह’ या शोमध्ये दिसत आहे, पण या शोला ना लोकप्रियता मिळत आहे ना शैलेश लोढा या शोमधून प्रेक्षकांची मने जिंकू शकला आहे.

भव्य गांधी

भव्य गांधींनी या मालिकेमध्ये टप्पूची भूमिका साकारून खूप लोकप्रियता मिळवली होती पण नंतर त्याने मालिका सोडली. ही मालिका सोडल्यानंतर त्याला इतर कोणत्याही मालिकेत काम मिळाले नाही. इतर ठिकाणीही तो त्याच्या करिअरमध्ये काही खास करू शकला नाही. सध्या तो गुजराती चित्रपटांमध्ये काम करत असला तरी त्याला तारक मेहतामध्ये काम करून जी ओळख मिळाली तशी तिथे मिळत नाही.

गुरुचरण सोढ़ी

तारक मेहतामध्ये सोढीची भूमिका करणारा अभिनेता गुरचरण सोढी देखील या मालिकेचा भाग नाही. ही मालिका सोडल्यानंतर त्याच्या करीअरचा आलेख अचानक घसरला. मिळालेल्या माहितीनुसार तो सध्या इंडस्ट्रीत सक्रिय नाही. अभिनयापासून दूर राहून तो वडिलांची काळजी घेत आहे.

दिलखुश रिपोर्ट

तारक मेहतामध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडणारी अभिनेत्री दिलखुश रिपोर्टरनेही मालिका सोडली. असे म्हटले जाते की तिला तिच्या कुटुंबासाठी वेळ द्यायचा होता आणि कुटुंबासाठीच तिने मालिका सोडली होती.

झील मेहता

या मालिकेमध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहताने आपल्या अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती. मात्र मालिका सोडल्यानंतर ती इंडस्ट्रीतून नाहिशी झाली. यानंतर तिला ना कुठली दमदार भूमिका मिळाली ना कोणते खास काम मिळालं.

निधी भानुशाली

तारक मेहतामध्ये झील मेहतानंतर निधी भानुशालीने सुमारे ६ वर्षे सोनूची भूमिका साकारली. मात्र, 2019 मध्ये निधीने आपल्या पुढील अभ्यासासाठी या मालिकेचा निरोप घेतला. या मालिका सोडल्यानंतरही सोनू काही विशेष करू शकली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम