चित्रपटात शाळेचा गणवेश घातलेल्या या ९ तारकांना ...

चित्रपटात शाळेचा गणवेश घातलेल्या या ९ तारकांना पाहून, नक्कीच शाळेचे दिवस आठवतील (These 9 Bollywood Actresses Wearing School Uniform Will Remind You Of School Days)

दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, आलिया भट्टसह बॉलीवुडच्या ९ अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये शाळेचा गणवेश परिधान केलेला असून या सर्वच तारका शाळेच्या गणवेशामध्ये अतिशय क्युट दिसल्या आहेत. त्यांना पाहिल्यानंतर आपल्यालाही आपले शाळेचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. कोणत्याही कलाकारास भूमिका साकारताना, त्या भूमिकेस न्याय मिळवून द्यावा लागतो. बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटांमध्ये शालेय विद्यार्थीनींची भूमिका साकारली असल्याने त्यांना शाळेचा गणवेश घालावा लागला. विशेष म्हणजे या अभिनेत्री त्यांच्या शाळेच्या गणवेशातही तितक्याच सुंदर दिसत आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या लूक बरोबरच त्यांचा अभिनय देखील खूप आवडला.

बॉलिवूड तारका ज्यांना चित्रपटात शाळेचा गणवेश घालावा लागला…

१) दीपिका पादुकोण चित्रपट छपाक

ॲसिड हल्ल्यासारखा संवेदनशील विषय असलेल्या, मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणने शाळेचा गणवेश घातला होता. शाळेच्या गणवेशातील दीपिकाचा क्यूटनेस दर्शकांनी खूपच पसंत केला. दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपटातील एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दीपिका शाळेचा गणवेश आणि स्कूलची बॅग घेऊन आपल्या वर्गमित्रासोबत कोठे तरी जाताना दिसते आहे

२) प्रियंका चोप्रा फिल्म मैरी कॉम

बॉक्सर मैरी कॉम यांच्या जीवनावर आधारित ‘मैरी कॉम’ या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्रा, शाळेचा गणवेश घालून बॉक्सिंग करताना दिसली. या चित्रपटामध्ये प्रियंकाने मैरी यांच्या शालेय जीवनापासून ते त्यांचे संघर्ष आणि पुढील आयुष्य देखील अतिशय उत्कृष्टतेने साकारले होते. प्रियंकाला या चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते.

३) सोनम कपूर चित्रपट रांझणा

‘रांझणा’ चित्रपटामध्ये सोनम कपूरने शाळेतील मुलगी ते कॉलेजमधील तरुण विद्यार्थीनी असं पात्र अभिनीत केलं होतं. सोनम कपूर या चित्रपटामध्ये शाळेच्या गणवेशामध्ये लहान मुलगीच वाटत होती. तिला पाहिल्यानंतर दर्शकांना त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. रांझणा चित्रपटातील सोनम आणि धनुष यांच्या अभिनयानस चाहत्यांकडूनही विशेष पसंती मिळाली होती

४) आलिया भट्ट चित्रपट स्टूडंट ऑफ द ईयर

आलियाने ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ या आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये एका चुळबुळ्या शालेय विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती. आणि पहिल्याच चित्रपटाने आलियाला प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. या चित्रपटामध्ये आलियासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे सहकलाकार होते. आणि गंमत म्हणजे या तिघांचाही हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या वेळी आलिया किशोरवयीनच असल्यामुळे तिला ही भूमिका साकारताना फारसे कष्ट पडले नाहीत. खरं म्हणजे आजही ती लहानच दिसते, परंतु ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ मधील तिचा अभिनय उत्तम होता.

५) यामी गौतम चित्रपट सनम रे

यामी गौतमने ‘सनम रे’ या चित्रपटात शाळेचा गणवेश घातला होता. गणवेशामधील तिचा क्यूट लूक दर्शकांना फारच आवडला होता. प्लेटेड स्कर्ट आणि लाल रिबिन लावलेली यामी खरोखर लोभस दिसते. यामी गौतमने आपल्या करिअरमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या, त्यामुळे बॉलिवूडमध्ये नवीन असूनही यामीने फार कमी वेळात आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे.

६) कल्कि कोचलिन चित्रपट देव डी

चित्रपट ‘देव डी’ मध्ये कल्कि कोचलिन, शाळेचा गणवेशासोबत मिनिमल मेकअप आणि पोनीटेलमध्ये दिसली होती. दर्शकांना कल्किची बिना मेकअपचा चेहराही खूपच आवडला होता. कल्कि कोचलिन अतिशय कुशल अभिनेत्री आहे. ती कोणत्याही भूमिकेमध्ये अतिशय चपखल बसते. देव डी मध्येही कल्किचे टॅलेंट पाहायला मिळाले.

७) प्रीति झिंटा चित्रपट क्या कहना

‘क्या कहना’ या चित्रपटामध्ये प्रीति झिंटा लाल रंगाचा शाळेचा गणवेश घालून दिसली होती. या चित्रपटामध्ये प्रीति झिंटा कुमारी माता झालेली दाखवली आहे. त्यामुळे यात तिला अनेक समस्या आणि टीकेला सामोरं जावं लागल्याचं दाखवलं गेलं आहे. प्रीति झिंटाने या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटाचा विषय बोल्ड होता, परंतु प्रीतिने आपल्या भूमिकेस पुरेपूर न्याय दिला होता.  

८) स्नेहा उल्लाल चित्रपट लकी: नो टाइम फॉर लव

स्नेहा उल्लालचा पहिला चित्रपट ‘लकी: नो टाइम फॉर लव’, यामध्ये ती सलमान खानसोबत दिसली होती. शालेय गणवेशातील स्नेहा उल्लाल या चित्रपटात खूपच गोड दिसली. स्नेहाने या चित्रपटामध्ये चेक्सचा शॉर्ट स्कर्ट, गुडघ्यापर्यंत लांब सॉक्स, ब्लू ब्लेजर आणि व्हाइट शर्ट घातला होता. स्नेहाचा हा फोटो त्यावेळेस अतिशय लोकप्रिय झाला होता. त्यावेळेस स्नेहाच्या सुंदरतेची ऐश्वर्या रायसोबत तुलना केली गेली होती. एवढंच नव्हे तर, ऐश्वर्यासोबत ब्रेक झाल्यानंतर सलमान तिच्यासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रींना लाँच करतो, असं म्हटलं गेलं होतं.

९) रिया सेन चित्रपट लव खिचडी

सुंदर तारका रिया सेनने ‘लव खिचडी’ चित्रपटामध्ये शाळेचा गणवेश घातला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत डॅशिंग रणदीप हुड्डा सहकलाकार होता. या चित्रपटामध्ये चेक्सचा लाल शॉर्ट स्कर्ट आणि व्हाइट शर्ट, सोबत टाय घातलेली रिया सेन खूपच क्यूट दिसत आहे.