दुसऱ्यांचा संसार मोडून, स्वतःचा संसार थाटणाऱ्या...

दुसऱ्यांचा संसार मोडून, स्वतःचा संसार थाटणाऱ्या अभिनेत्री (These 9 Bollywood Actresses Are Considered Home Breakers)

श्रीदेवी – आज श्रीदेवी जिवंत नाहिये. पण आपल्या हयातीत तिनं केलेलं कृत्य आजही विसरता येत नाही. कारण तिनं निर्माता बोनी कपूर याच्या मनात प्रवेश करून त्याचं प्रेम जिंकलं. तेव्हा बोनी कपूरने आपल्या बायकोला सोडून दिलं अन्‌ श्रीदेवीशी लग्न केलं. या प्रकरणाने इतका पेट घेतला की, बोनी कपूरची पहिली बायको मोना हिच्या आईने श्रीच्या पोटात लाथ मारली होती. श्रीसाठी बोनीने आपल्या मुलीला सोडले, याचा संताप येऊन ती माऊली चिडली होती. मुख्य म्हणजे श्रीला या लग्नाआधीच दिवस राहिले होते, त्यामुळे बोनीने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीला तिच्या प्रेमाचे फळ मिळाले खरे, पण ‘होम ब्रेकर’ म्हणून तिची लोकांनी अवहेलना केली होती. बोनीच्या आधी श्रीदेवी, विवाहित मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडली होती, पण त्यानं आपली बायको योगिताला सोडलं नाही.

शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टीने ‘बिग ब्रदर’ कार्यक्रमात विजय मिळवला अन्‌ ती व राज कुंद्रा यांचे मनोमीलन झाले. तेव्हा राज विवाहित होता, अन्‌ त्याच्या पहिल्या पत्नीने शिल्पाला दोषी ठरवलं. शिल्पामुळे आपला संसार व लग्न मोडल्याचं तिनं जाहीर केलं होतं.

स्मिता पाटील – वयाच्या ३१व्या वर्षी आजारपणात स्मिता पाटीलचा दुःखद अंत झाला. पण ती कारकीर्दीच्या शिखरावर असताना, तिच्यासाठी राज बब्बरने आपली बायको नादिरा हिचा त्याग केला होता. राज व स्मिता सिनेमात एकत्र कामे करुन प्रेमपाशात इतके गुरफटले की त्यांनी लग्न केले. स्मिताच्या मृत्युनंतर राज पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहू लागला.

रविना टंडन – चित्रपट वितरक अनिल थडानी हा विवाहित होता. पण रविना टंडनच्या मोहात तो पडला आणि सारासार विवेक गमावून बसला. त्यानं आपली बायको नताशा हिला घटस्फोट दिला नि रविनाशी रीतसर लग्न केलं. रविनाशी हे दुसरं लग्न त्याने थाटामाटात केलं होतं.

राणी मुखर्जी – निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी गुपचूप लग्न केल्याने राणी मुखर्जीची संभावना होम ब्रेकर म्हणूनच झाली. कारण आदित्यचं लग्न झालं होतं. त्याचा संसार मोडून राणीने आपला संसार थाटला. विशेष म्हणजे आदित्यचा, त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी प्रेमविवाह झाला होता. पण राणीच्या सौंदर्याची त्याला अशी भुरळ पडली की, हे प्रेम त्यागून, आपली बायको पायल हिच्याशी राणीसाठी घटस्फोट घेतला.

लारा दत्ता – मिस युनिव्हर्स असा सन्मान मिळवून लारा दत्ता बॉलिवूडमध्ये चमकली. पण तिनंसुद्धा आपला जोडीदार म्हणून महेश या विवाहित पुरुषाच्या गळ्यात माळ घातली. या महेशने, लारासाठी आपला ७ वर्षांचा संसार मोडला.

शबाना आझमी – कवी व लेखक जावेद अख्तर हे हनी इराणीचे पती होते. पण शबाना आझमीच्या प्रेमात ते असे अडकले की, त्यांनी हनीला सोडून शबानाशी संसार सुरू केला. फरहान व झोया अख्तर ही जावेदपासून हनीला झालेली मुले असून ते बॉलिवूडमध्ये नाव काढताहेत.

सारिका – दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन याचा आपली पत्नी वाणी गणपती हिच्याशी सुखाने संसार चालला होता, पण तो सारिकाच्या प्रेमात पडला. सारिकाला दिवस गेले. त्यामुळे दोघांनी लग्न केले. सारिकाने वाणीचा संसार मोडला. दोघे विलग झाले.

किरण राव – किरण राव ही सिनेमाची हिरॉइन नाही. पण दिग्दर्शन क्षेत्रात असल्याने सिनेसृष्टीत आहे. तिच्या प्रेमात पडून आमिर खानने आपली पहिली पत्नी रिना हिला सोडले.