दीपिका पादुकोणने नाकारले असे ७ चित्रपट, जे पुढे...

दीपिका पादुकोणने नाकारले असे ७ चित्रपट, जे पुढे सुपरहिट ठरले (These 7 Superhit Films Were Rejected By Deepika Padukone)

दीपिका पादुकोणने आतापावेतो एकाहून एक चांगल्या चित्रपटातून कामे केली. तिच्या सर्वच भूमिका गाजल्या आहेत. पण तिने असे चित्रपट नाकारले आहेत, जे पुढे सुपरहिट ठरलेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

धूम ३ – बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या ‘धूम ३’ या चित्रपटात कतरिना कैफने जी भूमिका निभावली ती आधी दीपिका पादुकोणला देण्यात आली होती. पण दीपिकाकडे आधीच इतक्या चित्रपटांची रांग लागली होती की, तिला त्या चित्रपटाला तारखा देता येत नव्हत्या. म्हणून तिने नाकारला. हा चित्रपट चांगलाच चालला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जब तक है जान – शाहरूख खान, कतरीना कैफ, अनुष्का शर्मा, ऋषी कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट दीपिकाने नाकारला. कारण काय ते कळलं नाही. अनुष्का शर्माने ती भूमिका केली, ती दीपिकाला देण्यात आली होती. हा चित्रपट चांगलाच चालला होता.

सुलतान – सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांचा सुपरहिट झालेला हा चित्रपट. यामध्ये अनुष्काच्या आधी दीपिका ही निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण काय बिनसलं कुणास ठाऊक दीपिकानं ही भूमिका करण्यास साफ नकार दिला.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रेम रतन धन पायो – या सुपरहिट चित्रपटात सोनम कपूरने केलेल्या भूमिकेची ऑफर आधी दीपिकाला देण्यात आली होती. पण तारखा नसल्याने तिने हाही चित्रपट नाकारला. याचा नायक सलमान खान होता. सलमानसोबत काम करण्याची ऑफर दीपिकाने पुन्हा नाकारली.

किक – या सुपरहिट चित्रपटातील एका धमाकेदार गाण्यासाठी दीपिकाला विचारण्यात आलं होतं. पण अशाच प्रकारचं गाणं आपण एका चित्रपटात केलं होतं. पुन्हा तोच प्रकार नको, म्हणून दीपिकानं नकार दिला. हे गाणं मग नरगिस फाकरीवर चित्रित करण्यात आलं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

रॉय – रणबीर कपूर नायक असलेल्या या चित्रपटातील भूमिका दीपिकाने नाकारली. त्यामुळे तिच्या जागी जॅकलीन फर्नांडिसला घेण्यात आलं. हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हॉलिवूडचा चित्रपट – हॉलिवूडचा चित्रपट मिळतो म्हटल्यावर आपले कलाकार आनंदाने उड्या मारतात. पण दीपिका याला अपवाद ठरली. तिला ‘फास्ट ॲन्ड फ्युरियस’ या हॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण त्यावेळी ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती बिझी असल्याने तिनं हा इंग्रजी चित्रपट नाकारला.