शाहरूख खान सोबत काम करण्यास नकार देणाऱ्या या ५ ...

शाहरूख खान सोबत काम करण्यास नकार देणाऱ्या या ५ धाडसी अभिनेत्री (These 5 Actresses Refused To Do A Film With Shahrukh Khan)

शाहरूख खान आता लोकप्रियतेच्या अशा शिखरावर पोहचला आहे की, सिनेमात त्याची नायिका होण्यास नव्या काय नि जुन्या काय, सगळ्याच अभिनेत्री उत्सुक असायला पाहिजे. पण शाहरूख बरोबर काम? नको रे बाबा!… असं म्हणत त्याला नाकारण्याचे धाडस येथील ५ अभिनेत्रींनी दाखवलं आहे…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

नयनतारा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक एटली यांच्या दिग्दर्शनाखाली शाहरूख खान एक भव्य चित्रपट करण्याची खबर मध्यंतरी आली होती. त्याची नायिका म्हणून नयनताराला विचारणा झाली, तेव्हा तिने साफ नकार दिला. कारण तिच्याकडे शूटिंगसाठी तारखाच शिल्लक नव्हत्या.

सामंथा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

तेलुगु चित्रसृष्टीमध्ये नयनतारा आघाडीची तारका आहे. तेव्हा तिने नकार दिल्यावर हिच भूमिका करण्यासाठी दिग्दर्शक एटली यांनी सामंथा या अभिनेत्रीला विचारलं. पण शाहरूखच्या ग्लॅमरला न भुलता सामंथाने देखील नकार दिला.

कंगना रणौत

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडची क्वीन अशी ख्याती पावलेली कंगना रणौत ही स्वतः शाहरूख खानची मोठी फॅन आहे. तरीपण तिने त्याची नायिका होण्यास चक्क नकार दिला होता. त्याचं असं झालं की, ‘झिरो’ या चित्रपटात कंगनाला, शाहरूखची नायिका म्हणून विचारण्यात आलं. पण शाहरूख बरोबर काम करण्याची संधी तिनं नाकारली. कारण काय, तर ही भूमिका माझ्या लायकीची नाही. तेवढी महत्त्वाची नाही, असं कंगनाने सांगत नाकारली.

श्रीदेवी

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

श्रीदेवी आज आपल्यात नाही. परंतु ती जेव्हा टॉपवर होती, तेव्हा ‘डर’ या चित्रपटामध्ये तिला शाहरूख खानची नायिका म्हणून दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ऑफर दिली होती, पण शाहरूख खान बरोबर काम करायला मिळतंय्‌ म्हणून हुरळून न जाता श्रीदेवीने ही भूमिका नाकारली. तेव्हा ही भूमिका जुही चावलास देण्यात आली.

करिश्मा कपूर

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

करिश्मा कपूरने शाहरूख खान सोबत ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात काम केलं होतं. या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालं होतं. तरीपण करिश्माने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात त्याच्या सोबत काम करण्यास नकार दिला होता. करण जोहर यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. करिश्माने नाही म्हटल्यावर रविना टंडन, तब्बू, उर्मिला मातोंडकर, ट्वींकल खन्ना यांना देखील करण जोहरने विचारून झालं. पण त्या सगळ्याच जणींनी नकार दिला. नंतर मात्र राणी मुखर्जी व काजोल यांनी शाहरूख सोबत हा चित्रपट केला. तो चांगलाच यशस्वी ठरला.