सुशिक्षित आणि सुविद्य असलेले १५ टी. व्ही. कलाका...

सुशिक्षित आणि सुविद्य असलेले १५ टी. व्ही. कलाकार (These 15 T.V. Actors Are Highly Qualified : Know who Studied What?)

टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले कलाकार, आपले अभिनय गुण आमि रूप याद्वारे लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी प्रेक्षकांची मने चांगलीच जिंकली आहेत. पण यापैकी १५ कलाकार असे आहेत, जे या ग्लॅमर क्षेत्रात येण्यापूर्वी शिक्षण क्षेत्रात खूपच पुढारलेले होते. शैक्षणिक क्षेत्रात ते चांगल्यापैकी सुशिक्षित आणि सुविद्य आहेत.

दिव्यांका त्रिपाठी

‘ये मोहब्बते है’ मालिकेतून नावारूपास आलेली दिव्यांका त्रिपाठीचे लक्षावधी चाहते आहेत. तिने नेहरू इन्स्टिट्यूट मधून गिर्यारोहणाचा कोर्स केलेला आहे. तिला साहसाची आवड आहे. म्हणूनच गिर्यारोहणाबरोबरच तिने रायफळ शूटिंगमध्ये प्राविण्य मिळवले असून त्यामध्ये अनेक मेडल्स जिंकली आहेत.

रोनित रॉय

रोनित रॉय प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की, तो ज्या शो मध्ये काम करतो, तो शो हिट होतोच. रोनितने हॉटेल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

दीपिका सिंह

‘दिया और बाती हम’ या कार्यक्रमातून नावारूपास आलेली दीपिका सिंह चांगलीच सुविद्य आहे. तिने पंजाब टेक्निकल इन्स्टिट्यूट मधून एम. बी. ए. केलं आहे.

मोहसिन खान

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत कार्तिकची भूमिका करणारा मोहसिन खान जितका चांगला दिसतो, तितकाच चांगला तो शिकला आहे. त्याने इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. आणि मॅनेजमेन्टचे पण शिक्षण घेतले आहे.

रुपाली गांगुली

‘अनुपमा’ ही मालिका पुष्कळ दिवसांपासून लोकप्रियतेच्या अव्वल स्थानावर आहे. या कार्यक्रमात प्रमुख भूमिका करणारी कलावती, रुपाली गांगुली हिने हॉटेल मॅनेजमेन्टची डिग्री घेतली आहे.

राम कपूर

टेलिव्हिजन क्षेत्रात आख्यायिका बनून राहिलेला राम कपूर बॉलिवूडमध्ये देखील यशस्वी ठरला आहे. त्याने लॉस एंजल्स येथून अभिनयाची मास्टर्स डिग्री घेतली आहे.

निया शर्मा

‘जमाई राजा’ व ‘नागिन’ फेम निया शर्मा हिला हॉट आणि सेक्सी स्टार म्हटले जाते. पण अशी प्रसिद्धी मिळवण्याआधी तिने उच्च शिक्षण घेतलेले आहे. मास कम्युनिकेशनमध्ये तिने ग्रॅज्युएशन केले आहे.

करण सिंह ग्रोवर

‘कुबुल है’, ‘दिल मिल गए’ आणि ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकांमधून खूपच लोकप्रिय झालेला करण सिंह ग्रोवरला हॉटेल उद्योगाची आवड होती. म्हणून त्याने हॉटेल मॅनेजमेन्टचा कोर्स केला आहे.

सुरभि ज्योती

‘नागिन’ फेम सुरभि ज्योतीने इंग्रजी विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

देवोलिना भट्टाचार्य

‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून गोपी बहू म्हणून प्रसिद्ध झालेली देवोलिना ज्वेलरी डिझायनर म्हणून करिअर करणार होती. तिने एन. आय. एफ. टी. मधून ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स केला आहे.

करण पटेल

‘ये है मोहब्बते’ मालिकेत रमण भल्लाची भूमिका करून प्रसिद्धी पावलेल्या करण पटेलने लंडन स्कूल ऑफ आर्टस्‌ मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.

रवि दुबे

रवि दुबेने इलेक्ट्रॉनिक्स इन कम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंग केले आहे. शिवाय त्याने पत्रकारितेचा डिप्लोमा केलेला आहे.

करण व्ही. ग्रोवर

‘सारथी’, ‘बहू हमारी रजनीकांत’ आणि ‘कहां हम कहां तुम’ अशा मालिकांमधून गाजलेला कलाकार करण व्ही. ग्रोवरने केमिकल इंजिनिअरिंग केले आहे.

शरद केळकर

हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून गाजत असलेल्या मराठमोळ्या शरद केळकरने मार्केटिंगमध्ये एम. बी. ए. केलं आहे.

त्रिधा चौधरी

अलिकडेच आलेल्या आश्रम या गाजलेल्या वेब सिरीजमधून त्रिधा चौधरीने पदार्पण केले होते. त्रिधाने मायक्रोबायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.