हिंदू धर्मावरुन कमल हसन यांचे विवादास्पद भाष्य,...

हिंदू धर्मावरुन कमल हसन यांचे विवादास्पद भाष्य, लोकांनी केले ट्रोल (‘There Was No Hindu Religion During Chola Period And Raja Raja Chola Was Not Hindu’ Claims Kamal Hassan, Gets Brutally Trolled)

अभिनेते-दिग्दर्शक कमल हसन यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्माबद्दल खोचक विधान केले आहे. चोल काळात हिंदू धर्माची संकल्पना नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. कमल यांच्या या विधानानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या वादाची सुरुवात मणिरत्नम यांचा ‘पोनियिन सेल्वन 1’ प्रदर्शित झाल्यापासून झाली आहे. हा चित्रपट राजराजा चोलनवर प्रेरित असलेल्या कल्कीच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट पाहिल्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वेत्रीमारन म्हणाले की, राजराजा चोलन हे हिंदू नव्हते.

वेत्रीमारन यांच्या वक्तव्यावर भाजप नेते एच राजा यांनी राजराजा चोलन हे हिंदू राजा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की “मी वेत्रीमारन इतका इतिहासात पारंगत नाही, पण राजराजा चोलनने दोन चर्च आणि मशिदी बांधल्या होत्या आणि तो स्वत:ला शिवपाद सेकरनही म्हणत होता, मग तो हिंदू कसा नाही??”

तामिळ दिग्दर्शकाच्या या विधानाला आता कमलचा पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला. राजराजा चोलनच्या काळात हिंदू धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता, असे कमल म्हणाले. तेव्हा वैनवम्, शिवम् आणि समानम हे धर्म होते. ब्रिटिशांनी या धर्मांसाठी एकत्रितपणे हिंदू हा शब्द वापरला. पोनियिन सेल्वनला पाहायला गेलेल्या कमलने सांगितले की, इतिहासावर आधारित कथा साजरी करुन इतिहासाची अतिशयोक्ती किंवा त्यात भाषेचा मुद्दा समाविष्ट करु नये.

कमल यांच्या विधानानंतर त्यांना ट्विटरवर चांगलेच ट्रोल केले जात असून लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कमेंटमध्ये लोक, कमल हा तमिळ भाषिक पप्पू आहे असे म्हणत आहेत. तर एका यूजरने लिहिले – कमल हासन हे खरे तर राहुल गांधी आहेत जे तमिळ बोलतात, एकाने लिहिले की कमल यांच्या म्हणण्यानुसार चोल काळात हिंदू धर्मासारखा कोणताही धर्म नव्हता, तर सत्य हे आहे की चोल काळात हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म नव्हता.

एका यूजरने कमल हासनचा राहुल गांधींसोबतचा हा फोटो शेअर करत लिहिले की, कमल हासनच्या या मूर्खपणामागे नक्की कोणती प्रेरणा आहे.

एका यूजरने लिहिले की, राजराजा चोलच्या वेळी हिंदू धर्म नव्हता आणि कमल हसनही हिंदू नाही…