कतरीना कैफ आणि विक्की कौशलच्या लग्नात झाले होते...

कतरीना कैफ आणि विक्की कौशलच्या लग्नात झाले होते भांडण, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा (There Was A Quarrel In The Marriage Of Katrina Kaif And Vicky Kaushal)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्यांच्या यादीत कतरीना कैफ आणि विकी कौशल यांचा समावेश होतो. या दोघांनीही लग्नाआधी आपल्या प्रेमाबद्दल कुठेही वाच्यता केली नव्हती. परंतु दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे लोकांना ते प्रेमात असल्याचे वाटू लागले होते. दोघांनीही आपले प्रेम जगापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तेही शक्य झाले नाही. कतरीना आणि विकीने राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. पण त्यांच्या लग्नादरम्यान मुलाकडचे आणि मुलीकडच्यांमध्ये जबरदस्त भांडण झाले होते. याबाबतचा खुलासा कतरीना कैफने काही दिवसांपूर्वी केला होता.

कतरीना आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेली होती.तेव्हा तिने आपल्या लग्नातील काही मजेशीर किस्से सांगितले. शोमध्ये कपिल शर्माने कतरीना कैफला विचारलं होतं की, तुला 7 बहिणी आहेत, मग लग्नात चप्पल लपवण्याच्या कार्यक्रमात कोण जिंकले होते ? कपिलच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कतरीना म्हणाली की, “आमच्या लग्नात यावरुन मोठे भांडण झाले होते. आमचे विधी चालू असताना अचानक मागून खूप मोठा आवाज ऐकू आला, मी मागे वळून पाहिले तेव्हा सर्वजण भांडत होते आणि विकीचे बूट खेचत होते. तिथे माझ्या बहिणी आणि विकीचे काही मित्र होते. ते खरोखरचं भांडत होते.”

त्यानंतर कतरीनाला ती लढाई कोणी जिंकली असा प्रश्न अर्चना पूरन सिंहने विचारला. त्यावर कतरीना म्हणाली की, मला नाही माहित. मी स्वत:च्याच लग्नात एवढी व्यस्त होते की मी याबद्दल कोणालाच विचारलं नाही.

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफने सांगितले होते की, अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’ या चित्रपटात मी पहिल्यांदा विकी कौशलला पाहिले होते. अभिनेत्री म्हणाली, “छोट्या ट्रेलरमध्येही त्याच्या अभिनयाने मी प्रभावित झाले होते. आनंद एल राय यांनी मला ‘मनमर्जियां’चा प्रोमो दाखवला होता.

या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल फारसे कोणाला माहित नाही. दोघांनीही यापूर्वी कधी याबद्दल सांगितले नव्हते, त्यामुळे दोघांमधील प्रेम कधी आणि कसे सुरू झाले याबद्दल काहीही सांगता येत नाही.पण विकी कौशलने अनेक प्रसंगी कतरीनावरील आपल्या प्रेमाची मजेदार पद्धतीने कबुली दिली होती. एका कार्यक्रमादरम्यान विकीने कतरीनाला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली होती, त्यावर कतरीनाने सुद्धा मजेशीर प्रतिक्रिया दिलेली.