‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानी परत येणार या चर्चेला निर्मात्याचा पूर्णविराम, दुसऱ्या अभिनेत्रीच्या ऑडिशनला सुरुवात (There Is No Come Back Of Disha Vakani In The Role Of Dayaben , Producer Of ‘Tarak Mehta…’ Clarifies; Auditions For New Dayaben Begins)

गेली कित्येक वर्षे टीव्हीवरील नंबर वन शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने २००७ पासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. या मालिकेतील प्रत्येक पात्र ही आपल्यातलीच वाटतात. दयाबेन हे पात्र साकारणारी दिशा वकानी म्हणजे मालिकेचे ताईतच म्हणावे लागेल. २०१७ मध्ये दिशाने ही मालिका सोडली असली तरी प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ कमी झालेली नाही. दयाबेन मालिकेत पुन्हा कधी दिसेल या वाटेवर चाहते डोळे लावून बसले आहेत. दरम्यानच्या काळात अनेकदा दयाबेन परत येत असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. पण आता मालिकेचे निर्माते आसितकुमार मोदी यांनी या बातम्यांना पूर्णविराम देणारा खुलासा केला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या निर्मात्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मालिकेत दयाबेन परत येईल पण दयाबेनच्या भूमिकेत दिशा दिसणार नाही. दयाबेनच्या भूमिकेसाठी सध्या ऑडिशन सुरु आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला मालिकेत नवी दयाबेन दिसेल.

२०१७ ला दयाबेन दिशा वकानीने प्रसूतीसाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला. त्यानंतर ती काही परतली नाही. त्यानंतर कित्येकदा ती परत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दयाबेनने पूर्णत: ती मालिका सोडली नसल्याने इतकी वर्षे दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला दयाबेनसाठी कास्ट करता येत नव्हते. परंतु तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत दयाबेनच्या एन्ट्रीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. स्वत: दिग्दर्शक आसितकुमार मोदींनी नव्या दयाबेनच्या ऑ़डीशन सुरु असल्याचे जाहिर केले. पण आता दयाबेनने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याची बातमी समोर आली असून तिचे मालिकेत परतणे आणखी लांबणीवर गेले असते. त्यामूळेच मालिकेच्या टीमने नवी दयाबेन आणण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला ग्रहण लागल्याचे दिसून येते. दयाबेनने मालिका सोडल्यावर टप्पूच्या भूमिकेतला भव्य गांधी, बावरी, रोशन सिंग सोढी, बबिता, अंजली या पात्रांनी मालिका सोडल्या होत्या. आता पुन्हा तारक मेहता का उल्टा चष्मा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता शैलेश लोढा यांनीदेखील मालिका सोडली आहे.