टीव्हीवरील या अभिनेत्रींमधून जात नाही विस्तव, ए...

टीव्हीवरील या अभिनेत्रींमधून जात नाही विस्तव, एकमेकींचा चेहरासुद्धा पाहणे पसंत करत नाहीत (There Has Been a Dirty Fight Between These TV Actresses, They Do Not Like to See Each Other’s Face)

मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींप्रमाणेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींमध्येही घट्ट मैत्री तसेच काही ठिकाणी कट्टर दुश्मनी देखील पाहायला मिळते. टीव्हीवरील काही अभिनेत्रींचे इतके मोठे भांडण झाले आहे की आता त्या एकमेंकींचे तोंड पाहणेही पसंत करत नाहीत. या यादीत शिल्पा शिंदे आणि हिना खानपासून शहनाज गिल आणि हिमांशी खुराना यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

शिल्पा शिंदे आणि हिना खान

टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि हिना खान ‘बिग बॉस 11’ मध्ये एकत्र दिसल्या होत्या. या रिअॅलिटी शोमध्ये दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. तसेच दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.अशाच एका भांडणात हिना खानने शिल्पा शिंदेला म्हैस आणि बेअक्कल म्हटले. त्यानंतर शिल्पाने मी हिनाचा चेहरा कधीच पाहणार नाही असे म्हटले होते.

शहनाज गिल आणि हिमांशी खुराना

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली होती, या शोमध्ये तिने आपल्या क्यूटनेसने प्रेक्षकांची मने जिंकली होती. परंतु शोमधील हिमांशी खुरानासोबतच्या तिच्या मतभेदाचीही खूप चर्चा झाली होती. बिग बॉसच्या घरात दोघीही एकमेकांना सतत टोमणे मारायच्या आणि भांडण करायच्या. आजही दोघींना एकमेकींचा चेहरा बघायला आवडत नाही.

रुबिना दिलैक आणि कविता कौशिक

रुबिना दिलैक ‘बिग बॉस 14’ ची विजेती ठरली होती. परंतु बिग बॉसच्या घरात तिच्या आणि कविता कौशिकच्या भांडणाची खूप चर्चा झाली. रुबिनाचा पती अभिनव याच्यावर कविताला मारहाण केल्याचा आरोप होता. त्यामुळे रुबीना आणि कविता यांच्यात खूप भांडणे झाली. ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्या भांडणामुळे दोन्ही अभिनेत्री आज एकमेकींशी बोलत नाहीत.

तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी

‘बिग बॉस 15’ ची विजेती तेजस्वी प्रकाश शोमध्ये करण कुंद्रासोबतच्या जवळीकतेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती,याशिवाय ती शमिता शेट्टीसोबतच्या भांडणामुळेही खूप चर्चेत आली होती. तेजस्वी अनेकदा शमिताला तिच्या वयावरुन टोमणे मारायची तर शमिता तिला नेहमी इनसिक्योर म्हणून डिवचायची. दोघींमध्ये वारंवार भांडणे व्हायची आणि शो संपल्यानंतरही त्यांच्या नात्यात कटुता कायम आहे.

रश्मि देसाई आणि देवोलीना भट्टाचारजी

टीव्हीवर सुसंस्कृत सून अशी प्रतिमा असलेल्या रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचारजी या ‘बिग बॉस 13’मध्ये एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी म्हणून दिसल्या होत्या, पण जेव्हा दोघी पुन्हा एकदा ‘बिग बॉस 15’मध्ये आल्या तेव्हा मात्र त्या दोघींमध्ये तुफान भांडणे पाहायला मिळाली. भांडणाच्या वेळी दोघींनीही एकमेकींना खूप काही सुनावले होते. आजही दोघी एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत.

गौहर खान आणि तनीषा

गौहर खान आणि तनीषा ‘बिग बॉस 7’ मध्ये एकत्र दिसल्या होत्या. बिग बॉसच्या घरात दोघींमध्ये वारंवार भांडणे होत होती. भांडणाच्या वेळी तनीषाने गौहर खानच्या संगोपनावर प्रश्न केला होता, त्यानंतर गौहरने तिला बरंच काही ऐकवलं होतं. त्या काळात त्यांच्यातील संबंध अजिबात चांगले नव्हते आणि आजही त्यांच्या नात्यात कटुता कायम आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम