रणबीर कपूरला करायचे आहे पाकिस्तानी चित्रपटांत क...

रणबीर कपूरला करायचे आहे पाकिस्तानी चित्रपटांत काम, म्हणाला, कलाकार आणि कलेला कोणतीही सीमा आणि बंधन नसते (‘There Are No Boundaries For Artists, Especially For Arts…’ Ranbir Kapoor Says He Would Love To Work In A Pakistani Film)

रणबीर कपूरने सौदी अरेबियातील रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीकडेच हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला व्हरायटी इंटरनॅशनल व्हॅनगार्ड अ‍ॅक्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तेव्हा मुलाखतीदरम्यान  त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यात एका पाकिस्तानी चित्रपट निर्मात्याने रणबीरला विचारले – आता आपल्याकडे सौदी अरेबियासारखे व्यासपीठ आहे, जिथे आपण एकत्रितपणे चित्रपट बनवू शकतो, मला तुम्हाला एका चित्रपटासाठी साइन करायचे आहे, सौदी अरेबियात पाकिस्तानी टीमसोबत काम करायला तुम्हाला आवडेल का?

या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला- नक्कीच सर, मला वाटतं कलाकारांना विशेषत: कलेसाठी मर्यादा नसतात. मला नक्कीच आवडेल. द लिजेंड ऑफ मौला जटसाठी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे खूप खूप अभिनंदन. गेल्या वर्षांतील सर्वात हिट चित्रपटांपैकी हा एक आहे.

रणबीरचे म्हणणे आपल्या जागी बरोबर आहे, पण गेली अनेक वर्षे पाकिस्तानी आणि भारतीय चित्रपटसृष्टीने एकमेकांच्या कलाकारांवर बंदी घातली आहे, त्यामुळे भारतातील लोकांना रणबीरचे हे उत्तर कसे वाटेल, हे सांगता येत नाही.

रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे विक्रम केले आहेत. या चित्रपटात रणबीरसोबत त्याची पत्नी आलिया भट्ट होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले होते. सध्या मुलगी राहाच्या जन्मानंतर तो काही काळ विश्रांती घेणार आहे. लवकरच तो अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे.