अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, साडेचार ल...

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, साडेचार लाखांचे घड्याळ लंपास (Theft In Kranti Redkar’s House: Watches Worth 4.50 Lakh Stolen)

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दैनंदिन आयुष्यासंबधीत व्हिडिओ पोस्ट करत असते. पण सध्या ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाली आहे. तिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीनेच चोरी केल्याचे उघड झाले आहे. अभिनेत्रीच्या घरीतील लाखोचा ऐवज चोरी झाला आहे.

घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच घरातील ऐवजावर डल्ला मारल्याचा आरोप क्रांती रेडकर हीने केला आहे. या चोरीत घरातील तब्बल साडेचार लाख रुपये किंमतीचे घड्याळ आणि काही दागिने चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. घरात कुणीही नसल्याची संधी साधत मोलकरणीने घरातील ऐवज चोरी केल्याची प्राथमिक क्रांतीने दिली आहे. सदर प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.

क्रांतीचे पती समीर वानखेडे हे एनसीबी अधिकारी आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात त्यांचे नाव खूप चर्चेत होते.