मुंबईत ‘नौदल दिना’च्या निमित्ताने जगातील सर्वात...

मुंबईत ‘नौदल दिना’च्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण (The World’s Largest National Flag – Unfurled On Navy Day 2021)

भारतीय नौदलाने मुंबईत ‘नौदल दिना’च्या (४ डिसेंबर) निमित्ताने गेट वे ऑफ इंडियाच्या जवळ नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण केलं. तब्बल २२५ फूट रुंद आणि १५० फूट उंच व चौदाशे किलो वजनाचा हा राष्ट्रध्वज खादी ग्रामोद्योग विभागाने तयार केला आहे.

नौदल दिन, The World's Largest National Flag, Unfurled On Navy Day
नौदल दिन, The World's Largest National Flag, Unfurled On Navy Day

सध्या सुरु असलेल्या नौदल सप्ताहानिमित्त नौदलाचे विविध उपक्रम सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. खादीचा हा राष्ट्रध्वज धरून ठेवण्यासाठी दोन विशेष क्रेनचा वापर करण्यात आला आहे. नौदल गोदीतच हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.

नौदल दिन, The World's Largest National Flag, Unfurled On Navy Day
नौदल दिन, The World's Largest National Flag, Unfurled On Navy Day

खादी ग्रामोद्योग विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या ध्वजाची संकल्पना मांडून तो तयार केला. त्यानंतर नौदल दिनानिमित्त त्या ध्वजाचे अनावरण करून तो राष्ट्राला अर्पण करत पुन्हा एकदा देशाची सुरक्षा आणि राष्ट्रहिताप्रती कटिबद्धतेची प्रतिज्ञा घेतली गेली.

फोटो सौजन्य – इंडियन नेव्ही / ट्वीटर