ठरलं ! या ठिकाणी होणार राणादा- पाठकबाईंचं खरं ल...

ठरलं ! या ठिकाणी होणार राणादा- पाठकबाईंचं खरं लग्न…(The Wedding Venue of Hardik and Akshay Is Revealed)

मालिकांमध्ये पती पत्नीची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा अभिनय पाहून ते खऱ्या आयुष्यात सुद्धा जोडीदार व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. काही मालिकांच्या बाबतीत ती इच्छा पूर्ण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या यादीत आणखी एका जोडीचे नाव समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेली महाराष्ट्रीची लाडकी राणादा आणि पाठकबाईंची जोडी.

काही दिवसांपूर्वीच राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरचा साखरपुडा पार पडला. अचानक या दोघांचे साखरपुड्याचे फोटो पाहून अनेकांना आनंदाचा धक्का बसला. या आधी अक्षयाचे नाव अभिनेता सुयश टिळकशी जोडले होते. पण काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने अक्षया कोणाला डेट करत आहे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

पण ज्यावेळेस ती हार्दिकला डेट करत असल्याची बातमी त्यांच्या साखरपुड्यामुळे समजली तेव्हा मात्र त्या दोघांच्याही चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. साखरपुडा तर झाला आता हे दोघे लग्न कुठे करणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी चला हवा येऊ द्या या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या नात्याबद्दलचे अनेक खुलासे त्यांनी केली. तसेच लग्न कुठे करणार या प्रश्नावर हार्दिकने सांगितले की त्यांना पुण्यात लग्न करायचे आहे. पण ठिकाण अजून ठरलेले नाही. विराजस आणि शिवानीने ज्या ठिकाणी लग्न केले ती जागा सध्या आम्हाला आवडली आहे. त्यामुळे तिथेच लग्न करण्याचा आमचा विचार आहे. 

हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुड्याची तयारी ही कोल्हापूरवरुन करण्यात आलेली. या दोघांचे कोल्हापूरशी खास नाते असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात तिथल्या गोष्टींचा वापर करुन करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कपडे कोल्हापूरमधून खरेदी केलेले. 3 मे रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला होता.