स्वत:चे फोटो स्वत: काढण्याचे परिणाम असे म्हणत अ...

स्वत:चे फोटो स्वत: काढण्याचे परिणाम असे म्हणत अनुष्काने केले बिकिनीवरील फोटो शेअर ; तर चाहत्यांनी केले ट्रोल (‘The Result Of Taking Your Own Photos…’ Says Anushka Sharma As She Shares Bikini Pictures From Maldives Vacay)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक वमिका नसल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. आता अनुष्काचे काही फोटो व्हायरल होत असून त्यातून ती मालदीवला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ते फोटो पाहून , एवढ्या छोट्या मुलीला नोकरांकडे ठेवून कसे काय कोण सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकत असे काहींनी म्हटले आहे. खरेतर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ट्रोलिंगला कोण थांबवणार?

नुकतेच अनुष्काने तिचे मालदीवचे फोटो शेअर करत त्याला मजेशीर कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये तिने बिकिनी आणि त्यावर ऑरेंज लेयरिंग फ़्लोई क्रॉप टॉप घातल्याचे तुम्ही पाहू शकता. या स्टाइलिश फोटोंना अनुष्काने स्वत:चे फोटो स्वत: काढण्याचे परिणाम असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

पुढे अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर त्यातलेच काही हॉट फोटो शेअर करुन त्यांची आपापसात तुलना केली आणि ३ सेकंदाच्या टाइमरमध्ये असे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो आल्याचे तिने सांगितले.

तिच्या चाहत्यांना तिचे फोटो आवडले असून तुझ्यापेक्षा आणखी हॉट कोणी असूच शकत नाही असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर काहींनी अनुष्काच्या फोटोंना ट्रोल केले आहे. एकाने कमेंटमध्ये अनुष्काने हे काय घातले असे विचारले तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले की, अनुष्का नेहमी खूप छान कपडे घालते त्यावर ती खूप सुंदर दिसते पण यावेळी तिने हे काय घातले आहे. यापेक्षा चांगले काहीतरी ती घालू शकत होती.

तिच्या चाहत्यांना तिचे फोटो आवडले असून तुझ्यापेक्षा आणखी हॉट कोणी असूच शकत नाही असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर काहींनी अनुष्काच्या फोटोंना ट्रोल केले आहे. एकाने कमेंटमध्ये अनुष्काने हे काय घातले असे विचारले तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले की, अनुष्का नेहमी खूप छान कपडे घालते त्यावर ती खूप सुंदर दिसते पण यावेळी तिने हे काय घातले आहे. यापेक्षा चांगले काही तरी ती घालू शकत होती.

दुसऱ्या युजरने म्हटले की, वरती एकावर एक कपडे लादले आहेत पण खाली ही तिने काही तरी घातले असते तर चांगले झाले असते.