वाळवी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना द...

वाळवी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिली खास ऑफर(The makers of Valvi movie gives a special offer to the audience)

सध्या सर्वत्र वाळवी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर इतका रहस्यमय आहे की त्याचा उलगडा करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. वाळवी हा चित्रपट आज सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पण विशेष म्हणजे या चित्रपटातच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे.

आज वाळवी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सहा ते दहा वाजताच्या शोचे तिकीट काढेल, त्याला एका तिकीटावर एक तिकीट मोफत देण्याची घोषणा झी स्टुडिओज टीमतर्फे करण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत प्रेक्षक ‘वाळवी’ पाहून साजरी करतील असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

‘वाळवी’ची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे असून सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.