ऐश्वर्या रायच्या अद्भूत सौंदर्याचे गारूड; तिच्य...

ऐश्वर्या रायच्या अद्भूत सौंदर्याचे गारूड; तिच्यासारख्या दिसणारींवर अद्याप कायम (The Magic Of Aishwarya Rai’s Amazing Beauty Still Persists, Her Lookalies are Also Proud Of Their Beauty)

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

ऐश्वर्या रायचे सौंदर्य अद्‌भूत आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही. जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा मान तिला मिळालेला आहे. मिस वर्ल्डचा मुकुट डोक्यावर चढवून तिला बरीच वर्षे झाली असली तर तिच्या मनमोहक सौंदर्याची चर्चा आजही होत असते. कुणाच्याही सौंदर्याची तुलना तिच्या सौंदर्याशीच केली जाते. यामध्ये तिच्यासारख्या दिसणाऱ्या काही कलावती आहेत. त्यांनाही आपल्या सौंदर्याचा तितकाच गर्व आहे.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

आमना इमरान – ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या तरुणींमध्ये आजकाल एक नाव खूप चर्चेत आहे. ती आहे पाकिस्तानातील ब्युटी ब्लॉगर आमना इमरान. आपले ऐश्वर्यासारखे रुप प्रसिद्ध करून आमना चर्चेत आहे. तिचे फोटो बघितल्यावर आपल्याही लक्षात येईल की आमना ऐश्वर्यासारखी दिसते.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

सोशल मीडियावर खूपच सक्रीय असलेल्या आमनाची त्या ठिकाणी जे फोटो झळकले आहेत, त्यामध्ये ती हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते आहे. तिने आपले काही व्हिडिओ अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ती ऐश्वर्या सारख्या पोझेस देते आह्. आमना ही ऐश्वर्याची कार्बन कॉपी असल्याचं मत मीडिया युजर्सनी दिलं आहे.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

स्नेहा उलाल – आमनाच्या आधी काही अभिनेत्रींची ऐश्वर्याशी तुलना सोशल मीडियावर केली गेली आहे. लकी नो टाइम फॉर लव्ह या चित्रपटातून २००५ साली स्नेहा उलालने पदार्पण केले होते. तिचा नायक सलमान खान होता. ती ऐश्वर्याची कार्बन, कॉपी आहे, असं लोक तेव्हा म्हणाले होते. अन्‌ ती ऐश्वर्यासारखी दिसते म्हणूनच सलमानने तिला संधी दिली, असंही लोक तेव्हा बोलत होते.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

महलगा जब्री – ऐश्वर्याचे रूप असलेल्या तरुणी परदेशातही आहेत. हुबेहूब तिच्यासारखी दिसणारी महलगा जब्री ही इराणी मॉडेल तेव्हा खूप चर्चेत आली होती. महलगा एक यशस्वी मॉडेल आहे व दिसायला चांगलीच सुंदर आहे. पण ऐश्वर्या रायची ती कार्बन कॉपी आहे, असंच तिच्याबद्दल लोक बोलतात.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

अमृता अम्मूज – आपल्या अभिनयाने टिक टॉक वर लोकप्रिय झालेली अमृता अम्मूज ही देखील ऐश्वर्यासारखी दिसते. लोकांनी तिची तुलना ऐश्वर्याशी केली आहे.

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

फोटोसौजन्य: इन्स्टाग्राम

ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे जगावर गारूड आहे, असाच अर्थ यातून काढता येईल. तिच्या चेहऱ्याची बार्बी डॉल देखील बनविण्यात आली होती. प्रत्येक स्त्रीला तिच्यासारखे सुंदर दिसावे, असे वाटत असते. अन्‌ तिने आपलं सौंदर्य आजही ज्या पद्धतीने टिकवून ठेवलं आहे, ते पाहता तिच्या पुढे जाण्याची क्षिती कोणाला होईल असे वाटत नाही.