‘द काश्मीर फाइल्स’ बघून सुनील शेट्ट...

‘द काश्मीर फाइल्स’ बघून सुनील शेट्टी व रितेश देशमुख यांनी केली अफाट स्तुती (The Kashmir Files: Suniel Shetty – Ritesh Deshmukh Praised The Film Fiercely)

‘द काश्मीर फाइल्स’ हा छोटया बजेटचा, नॉन कमर्शियल आणि नॉन ग्लॅमरस  चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या प्रशंसेचे पूर येत आहेत. एका गंभीर आणि संवेदनशील विषयाला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हात घातला आहे, ते पाहून लोकांनी त्यांची तोंड भरून स्तुती चालवली आहे

या लोकांमध्ये आता सुनील शेट्टी व रितेश देशमुख देखील सामील झाले आहेत. सुनील शेट्टीने ट्वीट केले आहे, “कथावस्तू हा या चित्रपटाचा राजा नव्हे, संपूर्ण  साम्राज्य आहे. चांगले चित्रपट लोकांच्या पचनी पडतात, याचा हा पुरावा आहे.”

रितेश देशमुख तर या चित्रपटाचा फॅन झाला आहे. “सतत विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चित्रपटाची भरपूर प्रशंसा करण्याची वेळ आली आहे. एक छोटा चित्रपट मोठ्या चित्रपटाच्या रांगेत जाऊन बसला आहे. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि ‘द काश्मीर फाइल्स’ च्या पूर्ण टीमचे अभिनंदन!”

१९९० साली काश्मिरी पंडितांना जबरदस्तीने पळवून लावले होते. त्यांच्या वेदना, व्यथा या चित्रपटात प्रभावीपणे मांडल्या आहेत. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पुनीत इस्सर आणि दर्शन कुमार व पल्लवी जोशी यांच्या दमदार अभिनयाने लोकांची माने जिंकली आहेत. खुद्द पंतप्रधानांनी या चित्रपटाची तारीफ केली असून कित्येक राज्यात त्याला करमाफी देण्यात आली आहे.